Uncategorized

“सत्याग्रही” वतीने वृक्षारोपण संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव येथील सामाजिक चळवळीचा समुह “सत्याग्रही” वतीने वृक्षारोपण कार्यक्रम गीता प्रशाला (जुनी नायडू बाई शाळा) कोपरगाव येथे नगराध्यक्ष पराग संधान, स्वच्छतादूत व वृक्षप्रेमी सुशांत घोडके, आरोग्य सभापती वैभव आढाव यांचे शुभहस्ते संपन्न झाला.

या प्रसंगी नगराध्यक्ष पराग संधान म्हणाले, “सत्याग्रही” चळवळीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांचे आयोजन प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
स्वच्छतादूत व वृक्षप्रेमी सुशांत घोडके म्हणाले, आधुनिक शहरीकरणामुळे वाढते तापमान आणि निसर्गाचा समतोल ढासाळतो आहे. पर्यावरण संवर्धनासाठी स्वदेशी झाडांचे वृक्षारोपण आवश्यक असल्याचे सांगितले.
या वेळी कडुलिंब, बकान यासह विविध रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमास सत्याग्रहीचे प्रमुख रामदास खैरे, सुभाष भास्कर, विजय बंब, पुरुषोत्तम पगारे ,अशोक नायडू, संभाजीराजे नाईक, कादरभाई शेख, किशोर भांगे, शरद थोरात, दिवाकर मकासरे, मधुकर कदम, बाळासाहेब पांढरे, शिवाजी थोरात, प्रभाकर वाणी, रमेश भास्कर, बाळासाहेब खडांगळे, वसंत शेळके, राजेंद्र बागुल, अरुण साळुंके, गिरीश हिवाळे यांचे सह विविध मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *