भाजपा- महायुती सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजनेचे स्वागत :- मा.आ.स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-
महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरू केलेल्या राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजनेच मा.आ.स्नेहलताताई कोल्हे यांनी स्वागत करत भाजपा-महायुती सरकारचे आभार मानले आहेत.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मा.आ.स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या की, भाजपा-महायुती सरकारने महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी सातत्याने लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. त्याचाच एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना होय. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनविण्याच्या दृष्टीने ही योजना अत्यंत दूरदृष्टीची असून राज्यासाठी आदर्शवत ठरणारी आहे.
या योजनेअंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील विधवा महिलांचे बचत गट, तसेच ‘उमेद’ आणि ‘माविम’ अंतर्गत नोंदणीकृत महिला बचत गट व ग्रामसंघांना शासनाची पडीक जमीन केवळ एक रुपया वार्षिक भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या जमिनीवर चारा, बांबू तसेच अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी आवश्यक कच्च्या मालाची लागवड, नर्सरी उभारणी आणि इतर उत्पन्नवाढीचे उपक्रम राबविता येणार असल्याने महिला बचत गटांना रोजगारासह उत्पन्नाचे नवे स्रोत उपलब्ध होणार आहेत.
या निर्णयामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार असून महिला बचत गट अधिक सक्षम, स्वावलंबी आणि आत्मनिर्भर होतील, असा विश्वास व्यक्त करत मा.आ.स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजपा-महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
