Uncategorized

योग हा आनंदी आणि संतुलित जीवनाचा सर्वोत्तम मार्ग – अभिजित शहा….

कोपरगाव प्रतिनिधी:- “योग ही भारताची प्राचीन आणि अमूल्य परंपरा असून निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवन जगण्यासाठी योग हा सर्वोत्तम मार्ग आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे वाढणारे ताणतणाव, विविध आजार आणि मानसिक अस्थिरता यांवर योग हा प्रभावी उपाय आहे. प्रत्येकाने नियमित योगसाधना अंगीकारून स्वतःचे आरोग्य जपावे. योगसाधकांनी योग संस्कृती घराघरांत पोहोचवून निरोगी समाजनिर्मितीत योगदान द्यावे,” असे प्रतिपादन योग गुरु अभिजीत शहा यांनी केले.

कोपरगाव नगरपालिका व समता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने साईसिटी, भामनगर येथील समता योग भवन व आरोग्य मंदिर येथे १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी ५० योगसाधिका व २५ योगसाधक व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश गुजराथी यांनी केले. योगगुरू अभिजित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. सौ. नाजुकाताई गव्हाळे यांनी पतंजली श्लोक, गायत्री मंत्र तसेच मराठी लोकगीतांवर आधारित योग सादरीकरण महिला योगसाधकांकडून करून घेतले. वसुदेव साळुंके व राघव साळुंके यांनीही उत्कृष्ट योगप्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

कार्यक्रमात नंदकुमार जाधव यांनी मनोगत व्यक्त करून योगाचे महत्त्व विशद केले. सौ. संगीता देवकर यांनी स्वलिखित योग कविता सादर करून योग, आरोग्य आणि मानसिक संतुलनाचा प्रभावी संदेश दिला. याप्रसंगी योगगुरू अभिजित शहा यांनी नियमित योगसाधनेद्वारे आजारांपासून दूर राहून निरोगी जीवन जगता येते, असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास समता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे उत्तमभाई शहा, जेठाभाई पटेल, योगगुरू अभिजित शहा, सौ. सुहासिनीताई कोयटे, सौ. किरण देशमुख, सौ. मंदा घनघाव, राजेंद्र जगताप, नंदकुमार जाधव, बाळासाहेब शेंडगे, बोरनारे सर, राजेंद्र वरखडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रसंगी उपस्थित योग साधक व साधिकांच्या वतीने योग प्रशिक्षक सतीश गुजराती व महेश थोरात विनामूल्य देत असलेल्या सेवेबद्दल सन्मान करून सत्कार करण्यात आला.
तसेच सौ. कांचन भंडारी, सौ. अनुसया भास्कर, सौ. कहांडळताई, सौ. संगीता म्हस्के, सौ. किरण देशमुख, सौ. मनीषा सोनवणे, सौ. सुमन रोहम, सौ. कांचन काजळे, सौ. उषा भंडारे, सौ. प्राजक्ता घोरपडे, सौ. संगीता गाडेकर, सौ. वैशाली जाधव, सौ. सुरेखा भोईर, सौ. क्षमा कुलकर्णी, सौ. संगीता देवकर, सौ. मीरा थोरात, सौ. निता पाटोळे, सौ. दीपमाला चव्हाण, सौ. विमल शिंदे, सौ. ज्योती सोनवणे, सौ. मंदा घनघाव, सौ. पूनम पाटोळे, सौ. रेखा कदम, सौ. संगीता बोरणारे, सौ. भारती यादव, सौ. सुनिता झावरे व सौ. ज्योती पारखे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला योगसाधक उपस्थित होत्या.

योग दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे परिसरात आरोग्य, तंदुरुस्ती आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश पोहोचला असून समता योग मंदिराच्या माध्यमातून योगप्रसाराचे कार्य अधिक बळकट होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *