लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने महा वज्रमूठ धरणे आंदोलनाचे आयोजन: – ऍड नितीन पोळ…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण करावे या मागणी साठी येत्या 27 एप्रिल रोजी आझाद मैदान मुंबई येथे लोक स्वराज्य आंदोलन व सम विचारी संघटनाच्या वतीने बेमुदत महा वज्रमूठ धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष ऍड नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
आपल्या प्रसिद्धी पत्रकात पोळ पुढे म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सामाजिक न्यायाचे स्वप्न पाहिले.लोक राजा राजश्री शाहू महाराज यांनी आपल्या राज्यात पन्नास टक्के आरक्षण जाहीर करून त्याची प्रत्यक्ष अंमल बजावणी केली तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटनेत आरक्षणाची तरतूद करून वंचित घटकाना सामाजिक न्यायाची हमी दिली. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळून देखील आजही अनुसूचित जातीतील मातंग, मेहतर, मादगी, ढोर,डक्कल वार आदी जातींना आरक्षणाचा प्रत्यक्ष लाभ मिळत नाही ही बाब लक्षात आल्या नंतर अनेक सामाजिक संघटनानी अनुसूचित जाती आरक्षणाचे वर्गीकरण व्हावे अशी मागणी केली तर या विषयाच्या विविध राज्यातील अनेक केसेस सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या. इंदिरा सहानी वि स्टेट या प्रकरणा नंतर मागील वर्षी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दलविंदर सिंग वि पंजाब या प्रकरणात सात न्यायाधीश यांचे खंडपीठ नेमून अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे अधिकार त्या त्या राज्यांना असल्याचे 1 ऑगस्ट 2024 रोजी निर्देश दिले या निर्णयामुळे हरियाणा,पंजाब,आंध्र प्रदेश,तेलंगणा आदी राज्यात अनुसूचित जाती आरक्षणाचे वर्गीकरण करणारा कायदा अस्तित्वात आला. या उलट महाराष्ट्र शासनाने निवृत्त न्यायाधीश अनंत बदर यांच्या नेतृत्वा खाली अभ्यास आयोग नेमला या आयोगाने आपला अहवाल शासनाला सादर केल्या नंतर सचिव राजेश अग्रवाल यांच्या नेतृत्वा खाली समिती नेमून या विषयावर हरकती मागवल्या मात्र अनुसूचित जाती मध्ये विभाजन होईल अशी भीती दाखवून अनुचित जाती आरक्षणाचा लाभार्थी जातीनी विरोध करणे सुरु केले असल्याचे दिसून येते मात्र महापुरुषांचे सामाजिक न्यायाचे स्वप्न अस्तित्वात आणायचे असेल तर वंचित जात समूहाना मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर आरक्षणाचे वर्गीकरण होणे आवश्यक आहे या विषयावर लोक स्वराज्य आंदोलन पंचवीस तीस वर्षा पासून संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.रामचंद्र भरांडे सर आक्रमक पणे लढा देत आहे. त्यामुळेच येत्या 27 एप्रिल रोजी आझाद मैदान येथे मांग, मादीगा, मेहतर, ढोर, डक्कल वार या वंचित घटकाना सोबत घेऊन महा वज्रमूठ बेमुदत धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून या आंदोलनात वंचित घटकांच्या संघटना व नागरिकांनी मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवाहन व्ही जी डोईवाड, रावसाहेब पवार, मादगी समाज नेते प्रा नक्कलवार सर समय्या पसूल ज्ञानेश्वर जगधने, दिपक आव्हाड, कांतीलाल जगधने, शरद त्रिभुवन अर्जुन मरसाळे,किरण सोळासे,भाऊराव साळवे आदिनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *