कोपरगाव नगरपरिषदेच्या नगरसेविका सुरेखा विनोद राक्षे यांची जनआरोग्य समितीच्या अध्यक्षपदी निवड…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव नगरपालिकेच्या नगरसेविका सुरेखा विनोद राक्षे यांची प्राथमिक आरोग्य केंद्र कोपरगाव येथे जन आरोग्य समितीमध्ये अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली असून त्यांचे सर्वस्तरावर अभिनंदन होत आहे.
कोपरगाव नगरपालिकेमध्ये युवानेते विवेकभैय्या कोल्हे तसेच नगराध्यक्ष पराग संधान यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेखा विनोद राक्षे या नगरसेविका म्हणून अतिशय उत्कृष्ट कार्य करत असून महिला नगरसेविका म्हणून त्यांनी कोपरगाव नगरपरिषदेच्या वाटचालीत काम सुरू आहे.या दरम्यान त्यांनी महिला कल्याण कामांसाठी अनेक समाजहिताच्या बाबींसाठी पुढाकार घेतलेला आहे.त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र शासन तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाकडून नुकतेच राष्ट्रीय शहरी अभियानाच्या अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कोपरगाव जन आरोग्य समितीमध्ये अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली आहे.
त्यामुळे नगरसेविका सुरेखा राक्षे यांचे कोपरगाव शहरातून सर्व स्तरावरून कौतुक होत असून एक महिला म्हणून कोपरगाव नगरपरिषदेमध्ये त्यांचे कार्य कौतुकास्पद आहेच,त्यामुळे राज्य शासनाने त्यांच्यावर जन आरोग्य समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी टाकली आहे ही कौतुकास्पद बाब आहे.

कोपरगाव नगरपालिकेच्या नगरसेविका सुरेखा विनोद राक्षे यांची जन आरोग्य समितीमध्ये अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे,मा.आ. स्नेहलताताई कोल्हे, युवानेते विवेकभैय्या कोल्हे,संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्ष रेणुकाताई कोल्हे,कोपरगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांच्यासह कोपरगाव नगरपालिकेच्या सर्व नगरसेवक व नगरसेविका यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. नगरसेविका सुरेखा राक्षे यांना पुढील वाटचालीसाठी सर्वांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत यापूर्वी त्यांनी नगराध्यक्ष म्हणून उत्कृष्ठ काम कोपरगाव शहरात केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *