दोन दिवसीय सहकारी बँक संमेलन संगमनेर मध्ये यशस्वीरित्या संपन्न…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
अहिल्यानगर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन आयोजित सहकारी बँकेचे दोन दिवसीय संमेलन संगमनेर येथील मालपाणी हेल्थ क्लब आणि रिसोर्ट येथे यशस्वीरित्या पार पडले
सदर संमेलनात जिल्ह्यातील एकूण १६ बँकेने सहभाग नोंदवला या संमेलनात ए आय चा बँकिंग क्षेत्रात वापर, सायबर सेक्युरिटी , डीपीडीपी कायद्याचे ज्ञान, आयटी मेळावा इत्यादी विषयावर ज्ञान सत्र आयोजित करण्यात आले होते
तसेच आंतर बँक क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये गायन स्पर्धा , कॅरम स्पर्धा , बॅडमिंटन स्पर्धा व कॅश काउंटिंग स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते
सदर संमेलनात बँकिंग रेग्युलेशन कायदा मध्ये सहकारी बँक संचालकांना कमाल दहा वर्ष कार्यकाळाच्या तरतुदी विरोधात ठराव करण्यात आला

सदर संमेलनास महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष सी ए भाऊसाहेब कड , महाराष्ट्र राज्य सरकारी बँक फेडरेशनचे अध्यक्ष सीए अजय ब्रम्हेच्या, संगमनेरचे आमदार अमोल खताळ , आमदार सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे , महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा , प्रसिद्ध उद्योगपती श्री गिरीशजी मालपाणी इत्यादींनी भेटी दिल्या व उपस्थितांना मार्गदर्शन केले अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष सत्येन मुंदडा व समन्वयक प्रकाश राठी व सुधाकर जोशी यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *