कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर-
कोपरगाव शहरात दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी ‘रमजान ईद’चा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व मुस्लीम बांधवांनी ईदगाह मैदान व अक्सा मस्जिद येथे सामुदायिक नमाज पठण केले. याप्रसंगी कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने सर्व मुस्लीम बांधवाना ‘रमजान ईद’ च्या शुभेच्छा दिल्या.

पवित्र रमजान महिनाभराच्या उपवासानंतर आज कोपरगाव शहरात रमजान ईदचा सण अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. ईदनिमित्त नमाज पठण करण्यासाठी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांचा जनसागर उसळला होता. नमाज संपन्न झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून सर्व मुस्लिम बांधवांची गळाभेट घेत त्यांना आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने ईदच्या शुभेच्छा दिल्या. सामाजिक बांधिलकी जपतांना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी या सणाचा आनंद मुस्लिम बांधवांसोबत द्विगुणित केला
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी-माजी नगरसेवक, विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *