विवेक कोल्हे यांनी इफकोचे संचालक पद हे इफको संस्थेची फसवणूक करून मिळवले :- नकुल कडू…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
इफको हि जगात एक नंबरची शेतकऱ्यांसाठी कार्य करणारी सहकारी संस्था आहे. या संस्थेमध्ये महाराष्ट्र तेलंगाना आणि गोवा या राज्यांमधून जनरल बॉडी सदस्य निवडून जातात. या जनरल बॉडी सदस्य निवडणुकीमध्ये खोटया कागदपत्रांच्या आधारे ठराव करून विवेक कोल्हे यांनी जनरल बॉडी सदस्य पद लाटले असल्याचे सहकार भारती प्रदेश सचिव व इफको संस्थेचे जनरल बॉडी सदस्य नकुल कडू यांनी शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहामध्ये शनिवार दि. २८ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.


इफको संचालक मंडळाची केस सुनवाई केंद्रीय निबंधकाच्या माध्यमातून लवादमध्ये चालू आहे. दरम्यान काही कागदपत्रांची पडताळणी करत असताना एक गंभीर बाब समोर आली. यामध्ये विवेक कोल्हे यांचे इफकोचे संचालक पद हे इफको संस्थेची फसवणूक करून मिळवले असल्याचे उघड झाले. विवेक कोल्हे सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघ कोपरगाव या संस्थेच्या माध्यमातून इफको संस्थेमध्ये संचालक पद मिळवले आहे. मात्र विवेक कोल्हे हे या संस्थेचे संचालक मंडळात नाही. परंतु कोल्हे यांनी या संस्थेचा संचालक म्हणून खोटा माहितीचा ठराव इफको संस्थेला सादर करून इफकोच्या संचालक मंडळाची निवडणूक लढवून संचालक पद लाटले आहे. मल्टि स्टेट ऍक्ट २००२ व इफाकोच्या निवडणूक नियमांनुसार ज्या संस्थेच्या वतीने प्रतिनिधित्व करायचे आहे. त्या संस्थेचे चेअरमन किंवा निवडून आलेले संचालक असणे बंधनकारक असते. विवेक कोल्हे हे संबंधित संघाचे ना निवडून आलेले संचालक आहेत ना चेअरमन ना व्यवस्थापकीय संचालक आहे हि बाब माहितीच्या अधिकारातून समोर अली आहे.
विवेक कोल्हे यांनी खोटे माहिती देऊन व खोट्या माहितीचा ठराव देउन इफको आणि इफको संबंधित संस्थांची आणि तीन राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. हि बाब केंद्रीय सहकार निवडणूक आयोगाचे चेअरमन आणि इफको संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक यांची नवी दिल्ली कार्यालय येथे समक्ष भेट घेऊन लेखी तक्रार दिली आहे. यावर लवकरच कारवाई होऊन कोल्हे यांचे जनरल बॉडी सदस्य पद रद्द होऊन संचालक पद अपोआप रद्द करण्यात येणार असल्याचे सहकार भारती प्रदेश सचिव व इफको संस्थेचे जनरल बॉडी सदस्य नकुल कडू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *