वारी शिवसेना शाखाप्रमुख मधुकर टेके यांनी भागविली गावाची तहान..!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील पुर्व भागातील सुमारे दहा हजारावर लोकसंख्या असलेल्या वारीगावच्या पाणीपुरवठा योजनेचे काम अनेकदा मंजूर होऊन देखील विविध अडचणी मुळे आजपर्यंत प्रलंबित राहिल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता
गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचे पाणी भर उन्हाळ्यात कमी झाल्याने वारी ग्रामस्थांची चिंता वाढली होती परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेनेचे वारीगाव शाखाप्रमुख
श्री मधुकर लक्ष्मण पा. टेके यांनी स्वतःच्या शेतात असलेल्या विहीरीतून स्वयंस्फूर्तीने पुढे येत गावासाठी मुबलक प्रमाणात बिनशर्त, निःशुल्क पाणी उपलब्ध करून देण्याची तयारी असल्याचे सरपंच सतिशभाउ कानडे यांना सांगितले त्यांच्या निर्णयाला कुटुंबातील सर्वांची संमती असल्याने पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मोठा मार्ग सापडल्याने सरपंच सतिश कानडे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात तातडीने ग्रामविकास अधिकारी,उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांची बैठक घेऊन टेके पाटील यांच्या विहीरी पासुन पाणी पुरवठा टाकी पर्यंत सुमारे तिन किलोमीटर अंतराची पाईपलाईन कामासाठी तातडीने मंजुरी घेऊन प्रत्यक्ष पाहणी करून बजेट तयार केले


खर्च मोठा असल्याने सोमय्या उद्योग समुहाच्या दि गोदावरी बायोरिफायणरीज लिमिटेड साकरवाडी या कारखाना व्यवस्थापना सोबत ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी तातडीने बैठक घेतली व याकामी सहकार्य करण्याचे आवाहन कारखाना व्यवस्थापनाला केले त्याला सकारात्मक प्रतिसाद देत जी बी एल कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर डी व्ही देशमुख साहेब ,एस मोहनसाहेब, बी पी पाटील, बी एम पालवेसाहेब यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत सहा लक्ष रुपये देण्याचे आश्वासन त्यांनी दिले उर्वरित सर्व खर्च ग्रामपंचायत वारीच्या वतीने करुन युद्धपातळीवर अहोरात्र काम पुर्ण करून गावाला स्वच्छ व मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करुन दिले असल्याने वारी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे
सामाजिक कार्यात मदत देण्यात नेहेमीच पुढे असणारे शिवसेना शाखाप्रमुख मधुकर टेके पाटील आणि परिवाराने गावाकरिता दाखविलेल्या दातृत्वाचे व धाडसाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे
पाणीपुरवठा पाईपलाईन चे सुमारे 10 लक्ष रुपये किंमतीच्या कामात जातीने लक्ष देऊन युद्धपातळीवर काम करून घेतले व एक लक्ष लिटर क्षमतेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीत स्वतः उतरून वारीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच मा सतिशभाऊ कानडे ,उपसरपंच मा विशालभाउ गोर्डे पाटील व पाणीपुरवठा विभागाचे मनोज जगधने, विलास जगधने, संदीप आगे यांनी टाकीची आतुन श्रमदान करून स्वच्छता करून घेतली


कोरोनाचा वाईट काळ सुरु असुन त्यातच पाण्याच्या प्रश्नाने गंभीर रुप धारण केल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले होते त्यावर तातडीने कार्यवाही करत मार्ग काढल्याने सरपंच सतिशभाउ कानडे ,उपसरपंच मनीषाताई विशाल गोर्डे,वारी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य ,सोमय्या व्यवस्थापन तसेच पंधरा वर्षे ग्रामपंचायतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मधुकर टेके यांच्या मातोश्री माजी ग्रामपंचायत सदस्या मुक्ताबाई लक्ष्मण टेके , मधुकर लक्ष्मण टेके, माजी सदस्या शैला मधुकर टेके ,ज्ञानेश्वर लक्ष्मण टेके, राजेंद्र टेके, सोपान काका टेके,शुभम टेके व सर्व टेके पाटील परिवाराचे तसेच विशाल गोर्डे व ग्रामविकास अधिकारी प्रशांत बरबडे यांचे वारी ग्रामस्थांनी तसेच जिल्हासहकारी बँकेचे सदस्य युवा नेते विवेक भैय्या कोल्हे ,जि प सदस्य राजेशआबा परजने ,माजी सभापती मच्छिंद्र टेके , पंचायत समिती सदस्य मधुकर टेके,शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाऊ झावरे,उपजिल्हाप्रमुख प्रमोद अण्णा लबडे ,शहर प्रमुख कलविंदर, दडीयाल,
शिवसेना तालुका प्रमुख शिवाजीराजे ठाकरे,
भरत मोरे ,माजी सरपंच रावसाहेब टेके,पोपटराव गोर्डे, नामदेवराव जाधव ,माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव कानडे ,प्रकाशराव गोर्डे , बाबासाहेब शिंदे, अँड शरद जोशी ,परशराम टेके, अशोक टेके ,आदींनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *