
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शिवसेनेचे कट्टर नेते सामाजिक कार्यकर्ते सुवर्णकार समाजाचे नेते कोपरगाव नगरपालिकेचे माजी “उपनगराध्यक्ष” अनेक वर्ष नगरसेवक श्री.योगेशजी बागुल व गणेश बागुल यांच्या मातोश्री सौ.सुलोचना तुळसीदास बागुल (अक्का) यांचे परवा दुःखद निधन झाले ! भावपूर्ण श्रद्धांजली
मी पवार सरकार वाड्यात (सराफ बाजार) येथे राहत असताना “अक्का” आमच्या शेजारीच राहत असे. अक्का प्रथमपासूनच धार्मिक व परोपकारी वृत्तीच्या होत्या !
कपाळावरील मोठे कुंकू त्यांच्या प्रसन्न व्यक्तिमत्व फुलून दिसत असे.
अत्यंत प्रेमळवृत्तीच्या अक्का आपल्यातून निघून गेल्या माझी धर्मपत्नी सौ.सुषमा हिला भेटल्यावर सुषमा तुझ कस चाललंय ? मुल बाळ काय करतात ? नेहमीच आस्तेवाईक पणे चौकशी करत वाड्यातील सौ. सुमनताई शिंदे सौ.देवळालीताई सौ.अरुणाताई जाधव सर्वांचीच आस्तेवाईक पणे चौकशी करत होत्या. त्यांच्या जाण्याने आमच्या अग्रवाल परिवाराला मोठे दुःख झाले आहे यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
-नारायण अग्रवाल कोपरगाव.
मो-9822630330
