

कोपरगाव प्रतिनिधी:-
महिलांसाठीचे सुलभ शौचालय स्वच्छ ठेवून ते निशुल्क करावं व आत येणारे जाणारे मुख्य प्रवेशद्वाराचे खड्डे तातडीने बुजवावे ही मागणी विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ मॅडम यांना माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी आज बस स्टॅन्ड येथे त्या तक्रार निवारण साठी आलेल्या असताना समक्ष भेटून दिली. यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे , यांत्रिकी प्रमुख पंडित , आगार प्रमुख अमोल बनकर , स्थानिक प्रमुख योगेश दिघे , सहाय्यक वाहतूक निरीक्षक नाना आहेर यांचेसह नागरिक उपस्थित होते.
कोपरगाव शहरात ग्रामीण भागातून शालेय शिक्षणासाठी, कॉलेज साठी मुली , शेतकरी महिला व नागरिक मोठ्या संख्येने गावाच्या ठिकाणी रोज ये जा करत असतात. ग्रामीण भागातील सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांसाठी कोपरगाव शहरात येणे जाण्यासाठी बस हे एकमेव परवडणार साधन आहे.
परंतु दुर्दैवाची गोष्ट की बस स्टॅन्ड मध्ये आत येताना व बाहेर जाताना जे दोन मुख्य प्रवेशद्वार आहेत तिथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून पावसामुळे पाणी साचले आहे व ते मुला मुलींच्या नागरिकांच्या एसटी बस व वाहन गेले की अंगावर उडत असते व आत जायला , बाहेर पडायला सर्वांना त्रास होतो. मोठे खड्डे असल्याने नागरिक यात पडतात सुद्धा. हे खड्डे तातडीने बुजवावे व बस स्टॅन्ड मधील सुलभ शौचालयात पैसे आकारले जातात ,घेतले जातात ते ह्या मुलींना नागरिकांना महिलांना परवडणारे नाही. बस स्थानकाची सुलभ शौचालय उभारून ते स्वच्छ ठेवणे व निशुल्क देणे ही जबाबदारी बस डिपार्टमेंट ची आहे.
मुख्य प्रवेशद्वारा मधील आत व बाहेर जाणाऱ्या रस्त्यात पडलेल्या मोठ्या खड्ड्यांबाबत बोलताना अधिकारी म्हणाले किती ही हद्द नगरपालिकेची आहे. आम्ही वेळोवेळी नगरपालिकेला कळवले पण अध्याप नगरपालिका ते करून देत नाहीत . यामुळे नगरपालिका आणि बस स्टँडच्या जागेच्या हक्काच्या वादात नागरिकांची हाल होत आहे. तरी नगरपालिकेने तातडीने खडी करण करून त्यावर तात्काळ डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण करून द्यावे , अन्यथा बस स्टॅन्ड हे बुजवावे व मुला मुलींना नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे.
विभाग नियंत्रक सपकाळ मॅडम यांनी तातडीने शौचालय बाबतीत व खड्डे बुजवण्याबाबत संबंधितांना सांगितले असे लवकर न झाल्यास शौचालयासाठी पाच रुपयापर्यंत पैसे मागतात हे बंधन झाल्यास शाळकरी कॉलेजला बसने प्रवास करणाऱ्या मुलींना व ग्रामीण भागातील महिला भगिनींना बस स्टॅंडवर सर्व बस गाड्या थांबून आंदोलन करावे लागेल.तसेच
कोपरगाव शहरात महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्यामुळे व बस स्टॅन्ड येथे पैसे मागत असल्याने मोठी गैरसोय महिला वर्गांची होत आहे.
