
कोपरगाव प्रतिनिधी:-
गेल्या एक वर्षापासून प्रशासन करोना ची साखळी तोडण्याच्या नावाखाली जनतेस वेठीस धरून पुन्हा लॉक डाऊन ची घोषणा करण्यात आली आहे मात्र दि ११ ते १४ हे चार दिवस लॉक डाऊन शिथिल करावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हाधिकारी यांना केले आहे
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की गेल्या एक वर्षांपासून करोना साथीच्या आजाराने थैमान घातले आहे प्रशासन करोना साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करत आहे त्यास नागरिक देखील चांगला प्रतिसाद देत आहे मात्र एक वर्ष उलटून गेले मोठ्या थाटामाटात लसीकरण मोहीम सुरू झाली मागील वर्षापेक्षा नागरिक देखील योग्य काळजी घेत आहे मात्र तरी देखील रुग्ण संख्येत व मृत्यू दरात वाढ झाली असून साथीच्या आजाराने पुन्हा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असून त्यामुळे पुन्हा लॉक डाऊन करण्यात येत आहे
दि ११ रोजी थोर समाज सेवक महात्मा जोतिबा फुले यांची जयंती तर दि १३ रोजी हिंदू नववर्ष अर्थात गुढी पाडवा तर दि १४ रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती आहे या तिन्ही महत्व पूर्ण दिवसात मोठ्या प्रमाणात साजरे केले जात असतात मात्र या दरम्यान लॉक डाऊन जाहीर करून जनतेच्या आनंदावर विरजण पडणार आहे
मागील काही दिवसांपासून अनेक राज्यात निवडणूक प्रचार रॅली काढण्यात येत आहेत मात्र या सणासुदीला लॉक डाऊन करून प्रशासन नागरिकांना वेठीस धरत आहे
महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य मानव मुक्तीच्या लढ्याला समर्पित केले असून त्यांचे अनुयायी सर्व सामान्य माणसाचा विकास डोळ्यासमोर ठेऊन त्यांच्या विचारांचा नेहमी गौरव करत असतात प्रशासनाने या कालावधीत विविध पक्ष संघटना यांना विश्वासात घेऊन करोना लसीकरण व जनजागृती चे कार्यक्रम घेता येऊ शकतात त्यास नागरिक मोठ्या प्रमाणावर सहकार्य करतील यात शंका नाही मात्र त्यासाठी प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा व या कालावधीत लॉक डाऊन शिथिल करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी या पत्रकात करण्यात आली आहे.
