

कोपरगाव प्रतिनिधी:- शनिवार, दिनांक 20 एप्रिल रोजी चैत्र उत्सवाच्या वार्षिक कार्यक्रमाच्या प्रथम दिवसाची सुरुवात पहाटे ०५:०० वाजता आत्मरुप मंदिरातील श्रीपादुकांचे विधीवत पुजन वेदमंञोच्चारात करुन आश्रमातील संत – महंतांच्या करकमलाद्वारे अभिषेक व काकड आरतीने करण्यात आली.
याप्रसंगी पौरोहित्य श्रीमान कुलकर्णी गुरुजींनी केले , तर पारंपरिक काकड्याचे अभंग हरिभक्तपरायण रोहम महाराज, सुर्यवंशी महाराज तसेच गणेश महाराज व सहकाऱ्यांनी गायणांस सुरुवात केली व आज भक्तिमय प्रभात विश्वात्मकाच्या चैतन्यपुरीत अनुभवण्यास मिळाली.
सकाळी ६ ते ७ दरम्यान गुरुमुखी भजनसेवा अर्पण करत प्रातः आरतीने आश्रमातील वातावरण आणखीन प्रसन्न झाले होते.
तद्नंतर ९ ते १० या वेळेत मौन ध्यान पाठ होवून , सकाळी 11 ते 12 व सायंकाळी 5 ते 6 या वेळेत आलेल्या सर्व भाविक भक्तांनी परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या पावन सानिध्यात सामुदायिक ध्यान केले… या दरम्यान आश्रमी कलाकार , गायक श्री.कृष्णा नरोडे , श्री किशोर कटारे सह , कबीरानंद महाराज भजनसेवा करताना तबल्याची साथ श्री संतोष सुतार, श्री समाधान चव्हाण यांनी दिली. महाआरतीने सञसांगता करण्यात आली, तद्नंतर उपस्थित भाविकांनी माऊलींच्या दर्शनाचा
लाभ प्राप्त करून घेतला.
सायंकाळी 6 ते 8 या वेळे मध्ये आत्मरुप सुवर्ण मंदिरामध्ये
शैक्षणिक संकुलातील वारकरी पथक व आश्रमी कलाकारवृंद यांच्या वतीने हरिपाठ व भजनाची सेवा सद्गुरू चरणी समर्पित करण्यात आली.
रात्री 9 वाजता शेजारती ने ह्या महोत्सवाच्या प्रथम दिवसाची सांगता करण्यात आली.
या प्रसंगी सकल संतपीठाच्या , तसेच आत्मा मालिक ध्यान योग मिशनच्या वतीने पूजनीय संत परमानंद महाराज यांनी सर्व भाविक भक्तांना या आत्मा मालिक चैत्र महोत्सवाच्या च्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
व ह्या चार दिवसीय महोत्सवाचे ऑनलाइन सुविधेने थेट प्रक्षेपण
देखील करण्यात येत असून
आलेल्या हजारो भाविकांची निवास व महाप्रसादाची व्यवस्था देखील ध्यान योग मिशन च्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती पूजनीय परमानंद महाराजांनी दिली तसेच
हा वार्षिक सोहळा आणखीन तीन दिवस चालणार असून दिनांक २२ एप्रिल, सोमवार रोजी संपन्न होणाऱ्या चैञ -चौदस च्या महापर्वासाठी पुजनीय महाराजांकडून सर्वाना आमंत्रण देखील देण्यात आले.
निवेदक
आत्मा मालिक ध्यान योग मिशन
आत्मा मालिक ध्यानपीठ ,कोकमठाण
