
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोल्हार कोपरगाव राज्य महामार्ग चे काम
कोल्हार ते कोपरगाव हा रस्ता राष्ट्रीय पायवाट म्हणून घोषीत व्हावी असा माझा आग्रह होता.. गेल्या दहा वर्षात खड्डे कमी पण सत्याग्रहच जास्त झालेत माझे..
३५३ सारखा सरकारी कामात अडथळा म्हणून गुन्ह्याचा वार देखील मी झेलला.. पण प्रत्येक सत्याग्रहाने रस्ता दुरूस्त होत गेला.. कधी कधी उच्च न्यायालयात देखील धाव घ्यावी लागली व न्यायालयाने सकारात्मक पणे निर्णय दिलेत.
आता देखील न्यायालयाने सार्वजनीक बांधकाम विभागाला धारेवर धरलेले आहे.. सावळीविहीर ते शिर्डी राष्ट्रीय महामार्ग घोषीत होऊन कामाच्या निवीदा न्यायालयाच्या दबावाने निघाल्या..
कोपरगाव ते सावळीविहीर रस्ता राष्ट्रीय महामार्ग घोषीत झाला.. पण छोटे अंतराचे काम करता येत नाही असे न्यायालयात सांगण्यात आले.. न्यायालयाने काम कसे करणार ते सांगा असे फट्कारले.. त्यामुळे आता राष्ट्रीय महामार्गाचा लघू विभाग एक दोन महिन्यात ताबा घेणार
अॅड प्रज्ञा तळेकर व अॅड आजिंक्य काळे यांनी रस्ता तर कराच पण रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा वाली कोण हे ठरवण्यासाठी न्यायालयाला साकडे घातले.. न्यायालयाने राज्या शासनाला कोल्हार कोपरगाव अंतरातील खड्डे तातडीने व गुणवत्तेत बुजवण्याचे आदेश दिलेत.. सार्वजनिक बांधकाम विभाग जागतिक बँक प्रकल्प यांनी १०.५० कोटी मंजूर केलेत..
आज प्रत्यक्ष मी निघोज निमगाव ,सावळिविहीर फाटा, जंगली महराज आश्रम व पुणतांबा चौफुली येथील कामांची पहाणी कार्यकारी अभियंता अंकुश पालवे व अभियंता रविंद्र चौधरीयांचे समक्ष उपस्थितीत केली.. खड्डे खोदून त्यात खडी मुरूमाचा स्तर दिला व त्यावर तीन खडी डांबराचे स्तर देऊन मजबूतीकरण करण्यात आले व काम चालू आहे.
अधिकाऱ्यांना मी तालुक्याच्या वतीने आवाहन केले की मोठा पुल ,येवला नाका, साई कॉर्नर ,शिरडी पोलीस स्टेशन, सावळिविहिर गावात, साई पालखी निवारा जवळील सर्व खड्डे गुणवत्तेत बुजवा व पावसाळ्यात वाहन चालकांचे हाल होणार नाही याचे सहकार्य करावे..
कार्यकारी अधिकारी पालवे यांनी अश्वासन दिले की अशीच गुणवत्ता सांभाळून रस्त्याची हस्तांतरणा पर्यंत व नंतर ओरड होणार नाही याची काळजी घेतली जाईल.. कोपरगावची जनता व वाहन चालकांच्या वतीने अॅड प्रज्ञा तळेकर व अॅड अजिंक्य काळे यांचे आभार
संजय भास्करराव काळे.
