
कोपरगाव प्रतिनिधी:-
डॉ अशोक गावित्रे हे अनेक वर्षापासून अवयदान प्रचार व प्रसार करत असून ते मोहन फाउंडेशन तसेच फेडरेशन ऑफ बॉडी ॲण्ड ऑर्गन डोनेशन व महाराष्ट्र शासन माध्यमातून अवयदान विषयी प्रबोधन करत आहे ,जागतिल महिला दीन निमित्त त्यांनी कोपरगांव तालुक्यातील आशा स्वयंसेविका ना अवयदान विषयी शपथ दिली तसेच त्यांचे फॉर्म देखिल भरून त्यांना या अवयदान कार्यात सक्रिय होण्यासाठी प्रबोधन देखील केले. अवयदान दान ही देशाची तसेच राज्याची देखील गरज असुन ,देशात पाच लक्ष मृत्यु हे दरवर्षी अवयव न मिळाल्यामुळे होतात आजही अवयदान शास्रीय माहीती नसल्याने व गैरसमज असल्याने अवयदान होताना दिसत नाही आज प्रत्येक घरपर्येत आरोग्यसेवा पुरवन्यच काम या आशा स्वयंसेविका करत असून त्याचा हा धाडसी निर्णय निचितच कौतुकास्पद असून महिला या अवयदान कार्यात देखील पुढे आहेत है त्यांनी दाखवून दीले आहे या कार्यसाठी त्यांना तालुका आरोग्य अधिकारी डॉ विकास घोलप तसेच सौ नीलम कानडे यांचे सहकार्य लाभल त्यांच्या या कार्यच सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
