प्रशासनाने केले जाहीर आवाहन..! :- तहसिलदार योगेश चंद्रे, पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे….

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोरोनाच्या दुसरी लाटे मध्ये कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे.
त्याअनुषंगाने कोपरगाव प्रशासनाच्या वतीने नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे.
(१) सार्वजनिक ठिकाणी ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई राहील. रात्री ८ ते सकाळी ७ दरम्यान ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आल्यास प्रती व्यक्ती रू. १००० दंड आकारण्यात येईल.
(२) अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्यक्तींच्या हालचालींवर किंवा फिरण्यावर रात्री ९ ते सकाळी ६ या कालावधीत निर्बंध राहील.
(३) शासनाने रात्री ८.०० ते सकाळी ७.०० कर्फ्यु जाहीर केला असून सर्व व्यवसायिक, नागरिक यांनी याची दखल घेवून. आपली आस्थापने/ दुकाने याकलावधी बंद ठेवावे.
(३ -अ) सर्व सार्वजनिक ठिकाणे रात्री ८ ते सकाळी ७ दरम्यान बंद राहतील. उल्लंघन केल्यास प्रती व्यक्ती रू. १००० दंड आकारण्यात येईल.
(४) विनामास्क आढळलेल्या व्यक्तीस रू. ५०० दंड आकारनेत येईल. सार्वजनिक ठिकाणी थुंकताना आढळलेल्या व्यक्तीस रू. १००० दंड आकारानेत येईल.
घरी राहा…. सुरक्षित राहा….
प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. कोरोना लक्षणे असलेली व्यक्ती आढळून आल्यास त्वरित शासकीय यंत्रणेस कळवावे.
योगेश चंद्रेे तहसिलदार,

वासुदेव देसले पोलिस निरीक्षक

प्रशांत सरोदे , मुख्याधिकारी, कोपरगाव नगर परिषद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *