
कोपरगाव प्रतिनिधी:-
सध्या निवडणुकांचे वारे पाहू लागले आहे.प्रत्येक पक्षाच्या जोमाने हालचाली चालू आहेत. त्यात काँग्रेसही आघाडीवर असून पण काँग्रेसच्या काही नेत्यांचे हितसंबंध असल्याकारणाने पार्सल उमेदवारांना मतदार संघात फिरवण्याचा कार्यक्रम जोरात चालू आहे. विविध कार्यक्रम घेणे मतदार संघात चाप्लूसी करणे असा कार्यक्रम काही तथाकथित उमेदवारांचा चालू आहे पण त्यांनी लक्षात ठेवा की आपण बाहेरील आहोत या मतदारसंघात आपण कधी येत नाही जनतेच्या मतदाराच्या आणि मतदार संघातल्या कोणत्याही अडीअडचणी प्रश्न यांना माहीत नाही या मतदारसंघात दहा वर्ष हेच झाले मुंबईच्या पार्सल येऊन दहा वर्ष मतदारसंघावर राज्य केले पण मतदारसंघातले प्रश्न सोडवायला असफल ठरले आणि मतदारसंघातले प्रश्न सातत्याने कायम आहेत म्हणून ह्या वेळेस काँग्रेसने सुद्धा कायम जनतेच्या संपर्कात असलेला उमेदवार देऊन या मतदारसंघात परिवर्तन करावे.जर पार्सल उमेदवार देण्याचा प्रयत्न केल्यास तर काँग्रेस मधूनच कडाडून विरोध केला जाईल असे मत जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांनी केले.
यासाठी आम्ही लवकरच पक्ष श्रेष्ठींची भेट घेणार आहोत.
आघाडीच्या काळातही या मतदारसंघांमध्ये बाहेरील उमेदवाराला संधी देऊन निवडून आणण्याचे काम झालं.
पण बाहेरील उमेदवारांनी मतदार संघाच्या कोणत्याच गावात जाऊन प्रश्न त्यांनी समजून घेतले नाही. स्थानिक पुढाऱ्यांना बाहेर येईल उमेदवार सोईस्कर वाटतो म्हणून त्याच्या पाठीशी राहून त्यांना निवडून देण्याचे काम करतात आणि स्थानिक उमेदवाराला उमेदवारी मिळवून न देण्याचं काम चालू असतं. मागील कालखंडातील या गोष्टी काँग्रेसमध्ये घडू नाही यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील यांची भेट घेऊन या संदर्भात सविस्तर चर्चा करणार आहोत. यावेळेस स्थानिक उमेदवार सक्षम असून त्यांचाच पक्षाने विचार करावा अशी रास्त मागणी मतदारसंघातून होत आहे.
प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वात योग्य माणसाला न्याय भेटल
चौकट- पक्ष नेतृत्व जो योग्य आणि सक्षम स्थानिक उमेदवार देईल त्याचा प्रचार आम्ही करू – राजेंद्र वाघमारे( जिल्हाध्यक्ष अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अ.जा.वी )
