श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात जागतिक प्रथमोपचार दिन उत्साहात संपन्न…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगांव येथील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात ९ सष्टेंबर हा दिवस जागतिक प्रथमोपचार दिन म्हणून साजरा करण्यात आला.कोपरगाव येथिल डॉ. गोपालकृष्ण जगदाळे यांनी विद्यार्थींना मार्गदर्शन केले.त्यांनी स्लाईड शो द्वारे प्रथमोपचार का व कसा करावा याची माहीती सांगितली.प्रथमोपचार अनेकांना जीवदान देवु शकते.
चक्कर येऊन खाली पडणे,बेशुद्ध होणे, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होणे,मोठ्या प्रमाणात भाजणे,विजेचा धक्का,झटके येणे,पाण्यात बुडणे ,साप, विंचू, मधमाशी चावणे,
आगीच्या धुरामुळे गुदमरणे ,चोकअप मुळे श्वास रोखणे ,उष्माघात, हिमस्खलनात अडकणे इत्यादी जोखमीच्या प्रसंगी आपण त्वरित प्रथमोपचार देणे हे नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे.यासाठी जीवरक्षक प्रणाली कशी वापरावी हे स्पष्ट करुन यावेळी काय करावे आणि काय करू नये हे महत्त्वाचे आहे या बाबत माहीती दीली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांनी केले.तर आभार उपमुख्याध्यापक श्री.रमेश गायकवाड यांनी मानले.
या प्रसंगी पर्यवेक्षिका उमा रायते, श्री.अनिल काले,सुरेश गोरे, आदि शिक्षक विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *