

कोपरगाव प्रतिनिधी:-
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख माजी मंत्री बबननाना घोलप यांच्या नेतृत्वाखाली उत्तर महाराष्ट्राच्या महीला संपर्कप्रमुख ॲड.शुभांगीताई पाटील आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या महीला संपर्कप्रमुख शुभदा ताई शिंदे तसेच उत्तर नगर जिल्हा संघटीका सपनाताई मोरे यांच्या शिवसेना झंझावाती दौऱ्यात आज संगमनेर शिर्डी कोपरगाव या ठिकाणी महीला मार्गदर्शन मेळावा आणि महीला आघाडीच्या नवीन पदांची नियुक्ती करण्यात आली,.
सपनाताई मोरे यांनी प्रास्ताविक केले,. आपल्या वर कितीही वाईट वेळ असली तरी महीलांनी डगमगता कामा नये,. अंतर्गत वाद विसरून उद्धवसाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहायचे आहे,.निलमताई गोऱ्हे,मनिषा कायंदे यांचे नाव न घेता सुंटे वाचून खोकला गेला अशी खोचक टीका केली,.या गद्दारांच्या जाण्याने आपल्या ईतर निष्ठावंत आणि कर्तृत्व वान महीलांना शिवसेनेच्या माध्यमातून जनसेवा करण्यासाठी मोठी संधी मिळेल यात तिळ मात्र शंका नाही,..
शुभदा ताई यांनी आपल्या मनोगतात सांगितले की उध्दवसाहेबांची आपण काळजी करू नका फक्त निष्ठेने बहीणी म्हणून खरी साथ द्या,.
शुभांगीताई यांनी अनेक प्रचारासाठी विरोधकांचे कमजोर मुद्दे दिलेत,.महीलांनी एकत्र येऊन ठाकरे कुटुंबीयांशी निष्ठा राखण्याचे आव्हान केले,. उध्दवसाहेब यांना पुन्हा मुख्यमंत्री करू यासाठी जोमाने अंतर्गत वाद विसरून कामाला लागा आणि महीलांना कसलीही गरज पडो अथवा संकट येवो संपर्क करा मी मदतीला धावून येईल असे आश्वासन दिले,. उत्तर महाराष्ट्रात जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी विडा उचलला आहे त्यासाठी मला तुमची साथ पाहिजे असे भावनिक आवाहन देखिल केले,..
राखीताई यांनी आभार मानले….
यावेळी शिवसेना उत्तर नगर जिल्हाप्रमुख प्रमोद अण्णा लबडे,. उपजिल्हाप्रमुख अस्लमभाई शेख, तालुका प्रमुख शिवाजीराजे ठाकरे, तालुका समन्वयक मुन्नाभाई मन्सुरी, शहरप्रमुख सनी वाघ,मा. शहरप्रमुख भरत मोरे,. संपर्क प्रमुख मनोजजी कपोते, प्रविण शिंदे,. शेतकरी संघटनेचे उल्हास पवार,. उपशहरप्रमुख आकाश कानडे,. पप्पू इंगळे, निलेश वाणी, सोमनाथ भोसले, संदिप आयोनर,.शेकडो महीला व पुरुष शिवसैनिक हजर होते.
