चैतन्य सोम ईश्वर बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम ; चिखलवाडी आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व कपड्यांचे वाटप…

Uncategorized

महाराष्ट्र दिनी चिखलवाडीच्या शाळेत चैतन्य सोम ईश्वर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व कपड्यांचे वाटप….
कोपरगाव प्रतिनिधी
(नाशिक):- महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नाशिकच्या चैतन्य सोम ईश्वर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिखलवाडी आदिवासी आश्रम शाळेतील ५० विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल अशा शालेय साहित्य, कपडे व मिठाईचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी शाळेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसाचे वाटप करण्यात आले.
नाशिकच्या चैतन्य सोम ईश्वर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सातत्याने विद्यार्थ्यांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यावेळी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिखलवाडी शाळेत ध्वजारोहण करत शाळेत शिक्षण घेणाऱ्या एकूण ५० विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल अशा शालेय साहित्य, कपड्याचे वाटप करण्यात आले.


या कार्यक्रमास संस्थेचे शंकर धनावडे, प्रा.आशिष चौरसिया, प्रा.सिध्दार्थ निंबाळकर, शाळेच्या मुख्याध्यापिका संगिता गिल, प्रा.धनगर सर, प्रा.दिलीप शिंपी, प्रो. रविंद्र सोनोने, महिला सदस्य हेमा चौरसिया, मंगला कांचवाला, देविका चौरसिया, अमोल शेलार, पवनकुमार सागु, जयराम वाघ, राजेश गांगुर्डे, प्रा. संजय देवरे, जनार्दन गिते, वंदना नागवंशि, सविता पवार, पंकज सुगंधी, प्रतिक्षा जाधव पवार मयुरेश जाधव, संकेत येवला यांच्यासह अंगणवाडी शिक्षिका श्रीमती गारे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र जाधव, प्रशांत जाधव, विनायक कस्तुरे व सर्व पदाधिकाऱ्यांकडून विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *