
कोपरगाव प्रतिनिधी:-
तालुका विधी सेवा समीती कोपरगाव व वकिल संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत कायद्याविषयक जागरुकता शिविर ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे पार पडले यावेळी मा. श्री भगवान पंडीत मुख्य न्यायदंडाधिकारी कोपरगाव न्यायालय यांनी उपस्थितांना कायदेविषयक मार्गदर्शन केले यावेळी प्रत्येकाला कायदेविषयक ज्ञान हवे तसेच कायद्याचे पालन करुन सार्वजनिक जीवनात कसे वागावे आरोग्य उत्तम कसे ठेवावे. आरोग्य कर्मचारी यांचे जनतेशी, रुग्णांशी कसे संबंध असावेत या विषयी मार्गदर्शन केले.

वैद्यकिय अधिक्षक डॉ. सचिन यादव यांनी मान्यवरांचे स्वागत केले व ग्रामीण रुग्णालय कोपरगावच्या कामकाजाविषयी माहीती दिली वैद्यकिय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसौंदर यांनी प्रास्ताविक केले तसेच डॉ. रणदिवे व डॉ. संजय उंबरकर यांनी आभार मानले.
या शिबीरासाठी ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथील सर्व कर्मचारी, डॉक्टर्स, बाल स्वास्थ कार्यक्रम, सर्व स्टाफ, नागरी आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवीका, आशा कार्यकर्त्या उपस्थित होते.
