आ. आशुतोष काळेंच्या हस्तेपद्मविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवार पतसंस्था मयत कर्जदाराच्या वारसास ३.६०लाखाचा धनादेश…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील गौतमनगर येथील पद्मविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेचे कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्जदार यशवंत बापू हाळनोर यांचे अपघाती निधन झाले होते. त्यांना विमा कंपनीकडून मिळालेला ३.६० लाखाच्या नुकसान भरपाईचा धनादेश नुकताच कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते त्यांच्या वारस पत्नी श्रीमती अलका यशवंत हाळनोर यांना देण्यात आला आहे.
कुटुंब प्रमुखाच्या अकस्मात निधनामुळे कुटुंबापुढे निर्माण होणाऱ्या आर्थिक अडचणीतून ते कुटुंब सावरले जावून त्या कुटुंबाची आर्थिक अडचण दूर व्हावी यासाठी संस्थेचे मार्गदर्शक मा.आ.अशोकराव काळे व आमदार आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार पद्मविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवार नागरी सहकारी पतसंस्थेने संस्थेच्या सर्व कर्जदारांचा ओरीएंटल इंशुरन्स कंपनीकडून विमा उतरविला आहे. संस्थेचे कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील मयत कर्जदार यशवंत बापू हाळनोर यांचा देखील यामध्ये समावेश असल्याने संस्थेने त्यांचा रु.४,५०,०००/- रुपयांचा विमा उतरविलेला होता. कर्जदार यशवंत बापू हाळनोर यांचे अपघाती निधनानंतर संस्थेकडून ओरीएंटल इंशुरन्स कंपनीकडे विमा पॉलिसीची भरपाई मिळावी यासाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली होती.
दि ओरीएंटल इंशुरन्स कंपनीने त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करून मयत सभासद स्व. यशवंत बापू हाळनोर यांच्या वारसांना पॉलिसिपोटी ३.६० लाख रुपयांची जनता व्यक्तिगत दुर्घटना विमा रक्कम मंजूर केली.त्या रक्कमेचा धनादेश नुकताच मयत यशवंत हाळनोर यांच्या वारस त्यांच्या पत्नी श्रीमती अलका यशवंत हाळनोर यांना आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन देवेंद्र रोहमारे, व्हा. चेअरमन रावसाहेब चौधरी, संचालक, अनिल महाले, महेंद्र काळे, सुदाम वाबळे, व्यंकटेश बारहाते, सौ. मेघा कडवे, सौ.परवीन सय्यद, वीरेंद्र शिंदे, ज्ञानेश्वर हाळनोर, दि ओरीएंटल इंशुरन्स कंपनीचे विमा प्रतिनिधी कैलास पांडे, मॅनेजर मंगेश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

फोटो ओळ – पद्मविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवार पतसंस्था मयताच्या वारसास ३.६० लाखाचा धनादेश देतांना आ. आशुतोष काळे समवेत चेअरमन देवेंद्र रोहमारे व संचालक मंडळ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *