कोपरगाव महसूल मंडळातील शेतकरी अतिवृष्टी अनुदानाच्या प्रतीक्षेत ;शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे कधी जमा होणार:- संचालक बाळासाहेब वक्ते…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(जेऊर कुंभारी):-
कोपरगाव तालुक्यात अतिवृष्टी मुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळणे चालू झाले असले तरी जेऊर कुंभारी सह तालुक्यातील शेतकरी अजूनही अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे त्यांच्या खात्यावर पैसे कधी जमा होणार सवाल सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते यांनी प्रसिद्धी पत्रकात उपस्थित केला आहे.
कोपरगाव तालुक्यात २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन,कपाशी, मका,फळबागा आदी सह पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते त्यातच भरीत भर म्हणून २०२३ च्या सुरूवाती पासुन तर आजतागायत अवकाळी पावसाने धिंगाणा घातला असुन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यावेळी पंचनामे करून शेतकऱ्याला योग्य तो मोबदला मिळावा यासाठी आजी माजी लोकप्रतिनिधी यांनी ही पाठपुरावा केला त्यानंतर घाई घाईत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्यासाठी शेतकऱ्यांचा सर्व डाटा गोळा केला परंतु त्याला अनेक महिने उलटून गेले तरीही मोठ्या प्रतीक्षेनंतर शासनाने काही शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देऊ केली , परंतु आजही जेऊर कुंभारी मंडळातील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. आजूबाजूच्या मंडळामध्ये काही शेतकऱ्यांना मदत मिळाल्याचे ऐकवयास मिळते परंतु तेवढी तटपुंजी मदत करून प्रशासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणे पुसण्याचा प्रयत्न केला आहे आता काय शेतकरी देशोधडीला लागण्याची वाट पहात आहेत का?
,या आस्मानी -सुलतानी संकटाचा सामना करताना जगाचा पोशिंदा मेटाकुटीला येऊन सैरभैर झाला आहे पिकासाठी केलेला खर्चही निघणार नाही अशी परीस्थिती आहे तरी मायबाप प्रशासनाने आता सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवुन द्यावी अशी मागणी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *