
कोपरगाव प्रतिनिधी:-
दिनांक 21 फेब्रुवारी 2021 रोजी अहमदनगर जिल्हा अध्यक्ष महिला समिती मा.सौ शोभा वर्पे यांना सावळीवीर फाट्याला सकाळी 11 वाजता एक निराधार मनोरुग्ण मुलगी नाव ज्योती रायबरन गौतम वय अंदाजे 18 वर्षे 7 महिने ही बेवारस अवस्थेत सापडली तेव्हा त्यांनी या मुलीला शिर्डी पोलीस स्टेशन येथे आणले तेव्हा या मुलीने सांगितले की आई औरंगाबादला असते मुळगाव प्रतापगड अमेठी गाव सिलोखर असे सांगत होती आई शी संपर्क केला असता सध्या मी येऊ शकत नाही असे त्यांनी सांगितले तेव्हा शिर्डी पोलीस स्टेशन यांनी साईआश्रया मध्ये मला संपर्क केला व या मुलीला नातेवाईक येऊ पर्यंत साईआश्रय देण्यास सांगितला

तेव्हा आम्ही या मुलीला साईआश्रयात घेतले यानंतर राहता ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय तपासणी व उपचारासाठी नेण्यात आले तेव्हा त्यांनी अहमदनगर जिल्हा रुग्णालय येथे तिला घेऊन जाण्यास सांगितले आम्ही या मुलीला तेथे घेऊन गेलो त्या ठिकाणी या मुलीची वैद्यकीय तपासणी व औषधोपचार सुरू करण्यात आले ही मुलगी बऱ्याच प्रमाणात मनोरुग्ण होती तेव्हा तेथील डॉक्टरांनी इंजेक्शन देऊन सात दिवसाची औषधे दिली यानंतर या मुलीला सुरक्षित साईआश्रयात ठेवण्यात आले

औषधोपचार मिळाल्यामुळे ही मुलगी बऱ्याच प्रमाणात पूर्ववत नॉर्मल व्हायला सुरुवात झाली होती तेव्हा दिनांक 25 फेब्रुवारी 2021 ला या मुलीचे आई-वडील शिर्डी पोलीस स्टेशन येथे पोहोचले तेव्हाआम्ही मुलीला घेऊन तेथे पोहचलो तेव्हा मुलगी आई-वडिलांना बघून खुप रडायला लागली वडील आम्हाला सांगत होते की ही मुलगी मनोरुग्ण आहे तेव्हा न सांगता कुठेही निघून जाते आज जवळजवळ वीस-पंचवीस दिवस झाले ही आमच्यापासून निघून गेली होती व 21 तारखेला शिर्डी पोलिसांनी आम्हाला ती भेटल्याचे सांगितले परंतुपैसे नसल्यामुळे आम्ही लवकर येऊ शकलो नाही तुम्ही हिला सुखरूप ठेवल्या बद्दल खूप खूप आभार आमची मुलगी आम्हाला सुखरूप मिळाली आम्ही व कर्तव्यदक्ष शिर्डी पोलीस स्टेशन चे पीआय लोखंडे साहेब समजून सांगितले की मुलीवर चांगले लक्ष ठेवा व चांगल्या डॉक्टरांना दाखवून तिच्यावर योग्य उपचार करा व काळजी घ्या काही मदत लागल्यास आम्हाला सांगा ती सुखरूप आहे हा साईबाबांचा चा कृपाआशीर्वाद अशाप्रकारे एका निराधार बेवारस मनोरुग्ण मुलीला तिचे आईवडील मिळाले
साईराम साईसेवक – गणेश दळवी MO- 9637549300
