नगरपालिका शाळेत बालिका दिन साजरा…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
3 जानेवारी रोजी सर्वत्र क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त बालिका दिन साजरा केला जातो. बेट भागातील नगरपालिका शाळा नं.५ कोपरगाव येथे बालिका दिन चक्रधर स्वामी प्राथ. विद्यालयच्या मुख्याध्यापिका मा. सौ. सुवर्णा मठपती -महानुभाव यांचे अध्यक्षतेखाली साजरा झाला. या प्रसंगी उपस्थित पाहुणे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक व शिक्षक यांचे शुभ हस्ते सावित्रीबाई फुले यांना पुष्पहार व फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई चे जीवन व शिक्षणाचे महत्व सांगितले. यावेळी शाळेच्या माजी मुख्याध्यापिका लीलावती जमधडे, प्रशांत शिंदे, नसरीन इनामदार -पठाण, सुनिल रहाणे या शिक्षकांनी आपल्या मनोगतातून महिलांचे शिक्षण व आधुनिक विकासात योगदान यावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. सुवर्णा महानुभाव यांनी मुलांना मुलगा -मुलगी मतभेद न करता समान वागणूक, मुलींचे शिक्षणाचे महत्व व सावित्रीबाईंचे मुलींसाठी योगदान विषद केले. मुलींना पूर्ण शिक्षण घेऊन आत्मनिर्भर होण्यासाठी सौ. इनामदार यांनी प्रेरणादायी उदाहरणे दिली. बालिका दिनाचे औचित्य साधून शालेय सर्वं मुलीकरिता मुख्याध्यापक श्री विलास माळी, श्री सुनिल रहाणे, सौ. नसरीन इनामदार -पठाण, श्री अमोल कडू यांनी कपडे मान्यवरांचे शुभ हस्ते वाटप केले. यावेळी मुलींच्या चेहऱ्यावर आनंद गगनात मावत नव्हता. यामुळे मुलींची शाळेतून गळती कमी होण्यास मदत होईल. या कार्यक्रमावेळी नगरपालिका शिक्षण मंडळाचे वरिष्ठ लिपिक श्री अमित पराई, समन्वयक श्री प्रशांत शिंदे,सुनीता शिंदे, अलका मतकर, ज्योती मोरे, रत्ना ढाकणे, साक्षी मतकर, रजनी काळे, व पालक, शिक्षक उपस्थित होते. मुख्याध्यापक विलास माळी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *