
कोपरगाव प्रतिनिधी:-
अहमदनगर जिल्हा राष्ट्रीय नाभिक एकता महासंघ, श्री साई पालखी निवारा निघोज-शिर्डी शिर्डी शहर व नाभिक समाज यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संतसेना महाराज यांच्या आशिर्वादाने आयोजित
राज्यस्तरीय वधू-वर-पालक परिचय मेळावा २०२३. श्री साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमी शिर्डी नगरीत होणाऱ्या राज्यस्तरीय वधू-वर-पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला असून सोमवार दि.१३ फेब्रुवारी २०२३ रोजी श्री साई पालखी निवारा, नगर-मनमाड रोड निघोज (शिर्डी) ता.राहाता जि.अहमदनगर येथे निसर्गरम्य वातावरणात संपन्न होणार आहे.सामाजिक बांधिलकीतून यावर्षी सर्वांगीन विचार करून सर्व नाभिक समाजाच्या आग्रहाखातर फक्त आणि फक्त २०० /- रूपये नाममात्र फी आकारुन राज्यस्तरीय वधु-वर-पालक परिचय मेळावा घेत आहोत. या मेळाव्याची वैशिष्टे
विना जाहिराती,खुर्ची विक्री पद्धती बंद,विना स्वागत समारंभ, प्रशस्त हॉल,सुसज्ज पार्किंग,निसर्ग रम्य वातावरण व प्राणी संग्रहालय,वधु-वर यांचा स्टेजवर परिचय,वधु-वर-पालक यांचा सुसंवाद,आलेल्या सर्व सन्मानीय पाहुण्यांचे स्वागत करणे.उपस्थित असलेल्या वधु-वर-पालक यांना माफक दरात पुस्तिका देणे.मेळाव्यात आलेल्या सर्वांना उत्तम जेवणाची व चहा-पाणी ची व्यवस्था करण्यात आली आहे.,आलेल्या प्रत्येक वधू-वरांना स्टेजवर मुलाखतीची संधी. वधू-वरांना क्रमांकानुसार बॅच वाटप.मेळाव्यात घटस्फोटीत, विधूर, विधवा, दिव्यांग किंवा इतर घटकांनी देखील विशेष प्राधान्य.असे वैशिष्टपुर्ण मेळावा होणार आहे.
या मेळाव्यासाठी आयोजकांच्या वतिने वधू-वर-पालक सर्वांना विनंती करण्यात येते की, आपल्या वधु आणि वराचा मेळावा ऑनलाइन फार्म भरून समाज उपयोगी कार्यक्रमास सहकार्य करावे, फॉर्म स्विकारण्याची शेवटची तारीख २० जानेवारी २०२३
राष्ट्रीय नाभिक एकता महासंघ, अहमदनगर जिल्हा सलून ब्युटीपार्लर असोसिएशन अहमदनगर जिल्हा,महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ अहमदनगर जिल्हा पदाधिकारी व सकल नाभिक समाज यांच्या वतिने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.



