पढेगाव ता. कोपरगाव येथुन चोरी केलेला संगणक संच व प्रिन्टर चोरी करणारे आरोपी कोपरगाव तालुका पोलीसांनी शिताफिने केले जेरबंद…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 443/2022 भा.द.वि.क. 457, 380 प्रमाणे दिनांक 09/11/2022 रोजी 18:36 वाजता दाखल करण्यात आलेला आहे. दिनांक 07/11/2022 रोजी 16:00 ते दिनांक 08/11/2022 रोजी सकाळी 08:30 वा. सुमारास पढेगाव ता. कोपरगाव येथील हिंदवी फोटो स्टुडीओ या दुकानातून कोणीतरी अज्ञात चोरट्याने 50,000 रु किंमतीचे संगणक संच व प्रीन्टर असा माल घरफोडी करुन चोरुन नेलेबाबत फिर्यादी विजय सुनिल गोल्हार वय 24वर्षे धंदा फोटोग्राफी रा. पढेगाव ता. कोपरगाव यांनी फिर्याद दिल्याने वरील प्रमाणे गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हयातील आरोपींचा शोध घेत असताना, सपोनि श्री सुरेश आव्हाड यांना गुप्त बातमीदारामार्फत संशयीत आरोपीबाबत माहीती प्राप्त झाल्याने सदरहु आरोपींचा शोध घेण्यात आला असुन गुन्हयातील आरोपी नामे 1) रणजीत धरमसिंग मुळेकर वय 24वर्षे 2) संतोष शामलाल यादव वय 40 वर्षे रा. दोघे शिवाजीनगर दहेगाव बोलका ता. कोपरगांव यांना दिनांक 10/11/2022 रोजी 00:34वाजता अटक करुन त्यांची दिनांक 12/11/2022 रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आलेली आहे. पोलीस कोठडी रिमांड मध्ये सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री महेश कुसारे व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुरेश आव्हाड यांनी करून सदर गुन्हयातील घरफोडी चोरी करुन नेलेला मुददेमाल संगणक संच व प्रींटर असा एकुण 50,000 रुपये किंमतीची चोरीस गेलेली सर्व मालमत्ता आरोपीकडुन भापुका क. 27 अंतर्गत 100 टक्के हस्तगत केली आहे.
सदरची कौतुकास्पद कामगीरी मा. पोलीस अधिक्षक, श्री राकेश ओला सो, मा. अपर पोलीस अधिक्षक सो, स्वाती भोर मँडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो श्री संजय सातव सो यांचे मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे श्री दौलत जाधव पोलीस निरीक्षक, स.पो.नि. श्री सुरेश आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे, सहाय्यक फौजदार सुरेश गागरे, पोहेकॉ इरफान शेख, पोहेकॉ आबासाहेब वाखुरे, चालक पो.ना. रामचंद्र साळुंके यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *