विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांची पुण्यात त्यांच्या निवासस्थानी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली….

Uncategorized

कोपरगाव प्रतिनीधी:-
विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांची पुण्यात त्यांच्या निवासस्थानी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली.. परिषदेच्या अधिवेशनाच्या समारोप समारंभास प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण त्यांना दिले.. त्यांनी ते मान्य केले.. निलमताई यांनी परिषदेला पन्नास हजारांची देणगी दिली.. एस.एम देशमुख यांच्याकडे त्यांनी हा चेक सुपूर्द केला.. यावेळी परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे पुणे जिल्हा निमंत्रक के. डी. गव्हाणे, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले उपस्थित होते.
एस.एम देशमुख यांनी निलमताई यांचे आभार मानले आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *