रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी रानभाज्यांचे आहारात महत्वाचे स्थान भाज्यांना मागणी वाढविण्यासाठी कृषि विभागाने याबाबत सातत्याने जनजागृती करावी:- ना.आशुतोष काळे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- निसर्गतः शेतात, माळरानावर उगवलेल्या रानभाज्या रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अत्यंत उपयोगी असून या रान भाज्यांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे.
ह्या भाज्या महोत्सव पुरत्या मर्यादित न रहाता ह्या रानभाज्या इतर भाज्यांप्रमाणे नागरिकांच्या आहारात नियमितपणे येण्यासाठी व ह्या भाज्यांची मागणी वाढावी म्हणून कृषि विभागाने याबाबत सातत्याने जनजागृती करावी असे आवाहन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी केले आहे.
कृषी विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तहसील कार्यालय कोपरगाव येथे ‘रानभाज्या महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले होते या महोत्सवाचे उदघाटन ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की,रानभाज्यांची कोणत्याही रासायनिक खते, फवारण्या किंवा सिंचनाशिवाय त्यांची वाढ होते.शरीराला आवश्यक, ऊर्जा देणारे, नवीन पेशी तयार होण्यास मदत करणारे, आवश्यक प्रमाणात खनिजे, जीवनसत्त्व व पोषकत्व शरीराला मिळणे होय. रानभाज्यांमध्ये पोषणमूल्यही उच्चदर्जाचे असून औषधी गुणधर्म देखील मोठ्या प्रमाणात असल्याने ग्रामीण भागात ह्या भाज्या आवर्जून खाल्ल्या जातात मात्र शहरात हे प्रमाण कमी आहे.त्यामुळे रानभाज्यांचे च महत्व आणि रानभाज्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी हा महोत्सव अत्यंत आदर्श उपक्रम असल्याचे ना.आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

यावेळी तहसीलदार विजय बोरुडे, माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, वासुदेव देसले, भूमी अभिलेखचे संजय भास्कर, कोपरगाव आगारप्रमुख अभिजित चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता प्रशांत वाकचौरे, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक मंदार पहाडे, हाजीमेहमूद सय्यद, फकीर कुरेशी, दिनकर खरे, संजय जगताप, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, विद्यार्थी शहराध्यक्ष कार्तिक सरदार, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार पोटे, जावेद शेख, प्रकाश दुशिंग, मनोहर कृष्णानी, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, सामाजिक कार्यकर्ते संजय काळे, बाळासाहेब रुईकर, अशोक आव्हाटे, राजेंद्र खैरनार, धनंजय कहार, आकाश डागा, इम्तियाज अत्तार, डॉ. आतिष काळे, शुभम लासुरे, मनोज कडू, रविंद्र राऊत, अंबादास वडांगळे, शैलेश साबळे, किशोर डोखे, प्रसाद उदावंत, योगेश नरोडे, राजेंद्र आभाळे, गणेश बोरुडे, रहेमान कुरेशी, नितीन साबळे, शिवाजी कुऱ्हाडे, शेखर रहाणे, अमित आगलावे, आकाश गायकवाड, राहुल राठोड, चांदभाई पठाण, हारुण शेख, राजेश शहा, नाना खडांगळे, बाळासाहेब शिंदे, किरण बागुल, फिरोज पठाण, विजय नागरे, हर्षल जैस्वाल, महेश मते, चंद्रकांत धोत्रे, सतिष खरात, गौरव कोपरे, आकाश नागरे, विशाल गुंजाळ, शकील चोपदार, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, अभियंता दहीफळे, विरपत्नी सरला जाधव, स्वाती चौरे, अंकिता भोसले, मंगल वलटे आदींसह शासकीय कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *