सौ. निता पवार यांचे निधन…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
तालुक्यातील शिंगणापूर येथील सौ. निता सुनिल पवार (५२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुले, सहा बहिणी असा परिवार आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे कर्मचारी सुनिल गजानन पवार यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांच्या पार्थीवावर कोपरगांव अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यांत आले.
कै. निता पवार यांच्या निधनाबददल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यांचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे व रयत शिक्षण संस्था उत्तर विभागाचे अधिकारी, पदाधिकारी आदिंनी शोक व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *