
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती सुनील अंबादास पाटील देवकर यांच्या मातोश्री तसेच तालुका शेतकरी सहकारी संघाचे ज्येष्ठ संचालक अंबादास कारभारी पाटील देवकर यांच्या पत्नी कै . जिजाबाई ( आक्का ) अंबादास देवकर यांचे बुधवार दि २ ९ जुन २०२२ रोजी दुःखद निधन झाले होते . त्या निमित्ताने नुकतीच सरलाबेटचे महंत रामगिरीजी महाराज यांनी देवकर यांच्या टाकळी येथील वस्तीवर भेट देत देवकर परिवाराचे सांत्वन केले .या प्रसंगी मधु महाराज , रमेश नवले , दादासाहेब सुंबे , शेतकरी संघाचे संचालक अंबादास देवकर , पंचायत समिती माजी सभापती सुनील देवकर , सुधाकर देवकर , परसराम देवकर , उपसरपंच संजय देवकर , गणेश देवकर , पांडुरंग देवकर , राजीव ( बापु ) देवकर आदी सह देवकर कुटूंबीय उपस्थित होते . कै . जिजाबाई ( आक्का ) अंबादास देवकर यांच्या पश्चात पती अंबादास पाटील देवकर तसेच सुनील अंबादास देवकर ( मुलगा ) , राजीव ( बापु ) अंबादास देवकर ( मुलगा ) , आरती रवींद्र ज ( मुलगी ) , पूजा अमोल खिरडकर ( मुलगी ) , मनीषा सुधीर शिद मुलगी ) व नातवंड असा मोठा परिवार आहे .
