

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव येथील गोदावरी नदीच्या मोठ्या पुलावर रात्री एक तरुण इसम आपली पत्नी व दोन वर्षाचे मुलासह आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी थोपविले व तीन निष्पाप जीव वाचविल्याने कोपरगाव तालुक्यात व परिसरात वासुदेव देसले व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले हे रात्री गोदावरी नदीच्या मोठ्या पुलावरून गस्त घालत असताना एक तरुण इसम नामे किसन चव्हाण आपली पत्नी व आपल्या छोट्या दोन वर्षाच्या मुलासह आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असताना त्यांच्या लक्षात आले. वासुदेव देसले यांनी त्वरित त्याठिकाणी गाडी थांबवून त्यांना थोपविले.
कौटुंबिक वादातून आत्महत्या करण्याच्या प्रयत्न असल्याचे त्याने सांगितले. वासुदेव देसले यांनी त्यांची समजूत काढून त्यांना त्यांचे नातेवाईक, मित्र यांचे सोबत सुखरूप पाठविले.
या घटनेमुळे परिसरात पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक होत आहे.
