अजितदादा पवार यांची महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे छगन भुजबळ यांनी भेट घेवून केले अभिनंदन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाल्याबद्दल दि.५ जुलै रोजी मा. श्री. अजितदादा पवार यांची राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ हेही उपस्थित होते.


महाराष्ट्राच्या विधिमंडळातील प्रदीर्घ कारकीर्दीचा अनुभव जनहितासाठी व सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच होईल. अजितदादा आपल्या आक्रमक वक्तृत्व शैलीतून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरतील व जनतेचे प्रश्न मार्गी लावतील असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विधानसभेत विरोधकांचा आवाज बुलंद करू असे त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *