सोमेश्वर देवस्थान मंदिरात हाॅकी खेळाचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचे सुपुत्र भारतीय हाॅकी संघाचे माजी कर्णधार, वर्ल्ड कप हाॅकीचे सुवर्णपदक विजेते श्री. अशोककुमारजी ध्यानचंद, यांच्यासह भुपेंद्रसिंग आदि मान्यवरांच्या हस्ते अभिषेक पुजापाठ संपन्न…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे सोमेश्वर महादेव देवस्थान येथे हाॅकी खेळाचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचे सुपुत्र भारतीय हाॅकी संघाचे माजी कर्णधार, वर्ल्ड कप हाॅकीचे सुवर्णपदक विजेते श्री. अशोककुमारजी ध्यानचंद, भारतीय हाॅकी खेळाडू श्री.भुपेंद्रजी सिंग, भारतीय ऑलिम्पिक संघाचे कोषाध्यक्ष श्री. अशोकजी दुधारे सर, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार सन्मानित श्री. दिलीपजी घोडके सर यांनी अभिषेक, पुजा, आरती करुन दर्शन घेतले. हाॅकी खेळाडू अशोककुमार ध्यानचंद यांना भारतीय ऑलिम्पिक संघाचे कान्स पदक असून,वर्ल्ड कप हाॅकीचे सुवर्णपदक विजेते आहे.

भारत सरकारचा मानाचा अर्जुन क्रीडा पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला आहे…सन १९७२ साली ऑलिम्पिक मध्ये हाॅकीत मिळालेले कान्स पदक त्यांनी सोबत आणले होते.ते सोमेश्वर महादेव येथे ठेवत नतमस्तक झाले.

सोमेश्वर महादेव दर्शनानंतर हाॅकी पटू अशोककुमार ध्यानचंद यांनी देवस्थानचे अभिप्राय नोंद वहीत ” देवो के देव सोमेश्वर महादेव मंदिर में विराजमान शिवलिंग कें दर्शन पाकर अनोखा आभास प्राप्त हुआ | मनमें शांती,विश्व शांती कि प्रार्थना करकें सोमेश्वर महादेव मंदिर सें प्रार्थना करी | बहुत ही असिम खुशी का अहसास हुआ | जय महादेव…हर हर महादेव…” या प्रमाणे अभिप्राय नोंदविला आहे. सोमेश्वर महादेव देवस्थानचे वतीने त्यांना पारंपरिक मानाची टोपी,उपरणे,श्रीफळ आणि प्रसाद देऊन स्वागत करण्यात आले. सोमेश्वर महादेव देवस्थानचे वतीने त्यांचा मानाची टोपी,उपरणे,श्रीफळ आणि प्रसाद देऊन स्वागत करण्यात आले…याप्रसंगी सोमेश्वर महादेव देवस्थानचे प्रमुख श्री.महेंद्रजी (बाळासाहेब) पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सुशांतजी घोडके, व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री.जयंतजी विसपुते,श्री.मनोजजी विसपुते,पौरोहित्य श्री.प्रदिपशास्री पदे, पुजारी श्री.नंदुजी शेंडे (गुरव) यांचे सह भक्त उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *