रवंदे धामोरी मळेगाव थडी येथे ८२ लाखाच्या रस्त्यांचे भूमिपूजन ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील रवंदे धामोरी मळेगाव थडी या ठिकाणी नामदार आशुतोष काळे यांच्या निधीतून ८२ लाखांचा रस्त्यांचे भूमिपूजन नुकतेच नामदार आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाले आहे.


यामध्ये रवंदे येथे २० लक्ष रुपये निधीतून बाजीराव कदम घर ते प्रकाश शिरवाडे घर (तालुका हद्द) रस्ता डांबरीकरण करणे, मळेगाव थडी येथे ३२ लक्ष रुपये निधीतून प्रजिमा ४ गाडे वस्ती ते पंडित खोंड वस्ती रस्ता डांबरीकरण करणे व धामोरी येथे २० लक्ष रुपये निधीतून धामोरी वेस ते बाळासाहेब दरेकर शेती रस्ता, तसेच २० लक्ष निधीतून धामोरी वेस (ग्रा.मा. १)ते तालुका हद्द रस्ता मजबुतीकरण या रस्त्यांचे भूमिपूजन व १० लक्ष रुपये निधीतून संतोष गाडे घर ते उसरे वस्ती रस्ता खडीकरण कामाचे लोकार्पण श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.


यावेळी ना.आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत धामोरीच्या भाजप कार्यकर्त्यांनी राजेंद्र धुमाळ,संदीप माळी व किरण पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.त्यांचे ना.आशुतोष काळे यांनी स्वागत केले.तसेच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत एम.पी.एस.परीक्षा उत्तीर्ण होवून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रुजू झालेल्या धामोरी येथील दिपक संजय मोरे यांचा ना.आशुतोष काळे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.


यावेळी माजी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानदेव मांजरे,सचिन चांदगुडे, अरुण चंद्रे, चंद्रशेखर कुलकर्णी, बाळासाहेबजी कदम, नारायणराव मांजरे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी,पंचायत समिती उपसभापती अर्जुनराव काळे, अनिलजी कदम, जिल्हा परिषद सदस्य सुधाकरराव दंडवते,शांताराम सांगळे, सुदाम भुसे, विनोद घोटेकर, उत्तमराव भुसे, विनोद धुळे, कोंडीराम काळे, सागर कदम, जगन्नाथ कदम, रामदास कदम, तान्हाजी कदम, सर्जेराव घायतडकर, अहिलाजी घायतडकर, कैलास घायतडकर, सुधाकर कदम, जितेंद्र काळे, अरुण कंक्राळे, केशव रहाणे, माधवराव घायतडकर, बाबासाहेब घायतडकर, प्रकाश काळे, कोंडीराम पवार, सर्जेराव कदम, पोलीस पाटील विलास मोरे, काशीराम कंक्राळे, हर्षल धुळे, विठ्ठल कंक्राळे, विलास कंक्राळे, रवींद्र घायतडकर, दत्तात्रय कदम, नितीन घायतडकर, गणेश घायतडकर, प्रताप बडदे, मच्छिन्द्र कदम, जयकुमार सोनवणे, गोरख दवंगे, विष्णु खोंड, शांताराम दवंगे, गिरीश धट, प्रकाश खोंड, नितीन खोंड, गंगाधर दवंगे, संजय गाडे, प्रकाश गाडे, वसंत गाडे, दिलीप दवंगे, विलास दवंगे, नवनाथ कदम, जालिंदर दवंगे, तान्हाजी दवंगे, भाऊसाहेब दवंगे, बाळासाहेब खोंड, अंबादास खोंड, लहानु भुसे, खंडू माळी, रविंद्र उगले, सुमित गाडे, गवबा उगले, संजय जाधव, उत्तमराव साबळे,पंडितराव जाधव, भास्करराव मांजरे, दत्तात्रय वाघ, बाळासाहेब भाकरे, संजय भाकरे, धोंडीराम पेखले, रामराव माळी, रामराव जगझाप, अमोल माळी, सुनील दरेकर, सुमित मांजरे, माणिक सोमासे, दत्तू भाकरे, बाळासाहेब खिलारी, संभाजी दवंगे, चैतन्य कुलकर्णी, इंद्रभान उसरे, संदीप जगझाप, कैलास नळे, संदीप आरगडे, शिवाजी भाकरे, अभिजित उसरे, दगु भाकरे, पुंडलिक माळी, सुदामराव गाडे, निवृत्ती शिंदे, पोपट आहिरे, दिलीप खिलारी, बाबासाहेब वाघ, शिवाजी दवंगे, गंगाधर दिघे, पुंजाहरी भाकरे, अनिल दरेकर, देवराम माळी, दिलीप माळी, भास्करराव वाघ, शिवाजी पेखले, नितीन पगारे, सुनील मांजरे, प्रदीप पगार, रामभाऊ भाकरे,सचिन कुऱ्हाडे, सुभाष आहिरे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, पंचायत समिती अभियंता लाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता गाडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *