नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन अध्यक्षपदी राजेंद्र फड तर वरिष्ठ उपाध्यक्षपदी पी.एम.सैनी…

Uncategorized

वाहतूकदारांनी एकसंघ होऊन काम करावे:- आमदार सीमा हिरे…

वाहतूक व्यवसायाला उद्योगाचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न करणार:- अध्यक्ष राजेंद्र फड…

कोपरगाव प्रतिनिधी
(नाशिक):- देशाच्या अर्थव्यवस्थेचा ट्रान्सपोर्ट उद्योग हा महत्वाचा कणा आहे. ट्रान्सपोर्ट क्षेत्रापुढे अनेक अडचणी आहे. त्या सोडविण्यासाठी एकसंघटीत होऊन पुढे आलं पाहिजे त्यातून आपले प्रश्न सोडविले जाऊ शकतात त्यामुळे वाहतूकदारांनी एकसंघ होऊन काम करावे असे प्रतिपादन आमदार सीमा हिरे यांनी केले.
नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने आज नाशिकच्या स्वामींनारायन हॉल येथे नवनियुक्त पदाधिकारी पद्ग्रहक सोहळा व डिरेक्टरी अनावरण व नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या मोबाईल अॅप लॉन्चिंग करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
या सोहळ्या प्रसंगी ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे कोअर कमिटी चेअरमन मलकितसिंग बल, महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रकाश गवळी,महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, मनीष रावल, माजी नगरसेवक लक्ष्मण सावजी, नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, वरिष्ठ उपाध्यक्ष पी.एम.सैनी, सुनील बुरड,दिलीपसिंग बेनिवाल, महावीर मित्तल,सुरेश खोसला, जे.पी.जाधव, संजय राठी, प्रमोद भावसार, हरनारायण अग्रवाल, राजेश शिंदे, राजेंद्र राजपूत, रवींद्र चव्हाण, सुभाष जागंडा, मेहबूब सुलतान, आयुब खान, रफीक शेख यांच्यासह पदाधिकारी व व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार सीमा हिरे म्हणाल्या की, ट्रान्सपोर्ट क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना एकत्रित येऊन नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनची स्थापना करण्यात आली. सर्व वाहतूकदार एकसंघ राहण्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बाब आहे.कोरोनाच्या काळात नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनने केलेलं सामाजिक काम अतिशय भूषवाह आहे. अंबड येथे ट्रक टर्मिनल विकसित करण्यासाठी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन विशेष लढा दिला असून त्याला यश मिळाले असून लवकरच सुविधापूर्ण ट्रक टर्मिनल विकसित होईल असे सांगत वाहतुकदारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करू असे आश्वासन त्यांनी यावेळी केले.
यावेळी प्रकाश गवळी म्हणाले की, ट्रक टर्मिनल उभे करण्याची तसेच रस्त्यावर वाहतूकदारांना सुविधा देण्याची जबाबदारी ही पूर्ण पणे शासनाची आहे.वाहतूक व्यवसायातून मोठा कर हा शासनाला दिला जातो. मात्र त्यात तुलनेत वाहतुकदारांना सुविधा मात्र मिळत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.महामार्गावर चालकांना होणाऱ्या त्रासाबद्दल महामार्ग समिती नेमली असून त्या माध्यमातून वाहतूकदारांचे प्रश्न सोडविले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनने वाहतुकदारांचे संघटन अधिक मजबूत केल्याने संस्थेचे व्यापक असे स्वरूप प्राप्त झाले आहे. दोन संघटना एकत्र आल्याने संघटना अधिक मजबूत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मलकीतसिंग बल म्हणाले की, नाशिक ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील संघटनांनी एकत्र येत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन ही संघटना स्थापन केली. संघटनेला नवी दिशा दिल्याने ही ऐतिहासिक घटना आहे. यामुळे संघटना अधिक मजबूत होणार आहे. ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट संघटना नाशिक डिस्ट्रिक्ट संघटनेच्या मागे खंबीरपणे उभी असून संघटनेचे प्रश्न सोडविण्यास मदत केली जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी संतोष मंडलेचा म्हणाले की, देशात चालक दिन १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो आहे. तो साजरा होण्यासाठी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा मोठा वाटा आहे. संस्थेच्या पुढाकाराने देशात चालक दिन साजरा होत आहे हे संस्थेच्या कार्याचे मोठं यश असल्याचे मंडलेचा यांनी सांगितले.
यावेळी अध्यक्ष राजेंद्र फड म्हणाले की,नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन ही नाशिकपूरती मर्यादित संस्था नाही तर मिनी भारत आहे. याठिकाणी देशभरातील विविध प्रांतातील लोक नाशिकमध्ये ट्रान्सपोर्ट व्यवसायात जोडले गेले आहे. नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच यश हे सर्व सदस्यांचे यश आहे. ट्रान्सपोर्ट व्यावसायिक हे एकसंघ राहण्यासाठी दोन महत्त्वाच्या संस्था एकत्र येऊन नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनची स्थापना करण्यात आली असून धर्म, प्रांत,जात याच्या पलीकडे जाऊन संघटनेतील सर्व लोक एकसंघटित झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ट्रान्सपोर्ट क्षेत्राच्या समस्या अगणित आहे. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत असून ट्रान्सपोर्ट व्यावसायाला उद्योगाचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी.एम.सैनी तर सूत्रसंचालन सीमाताई पेटकर यांनी केले.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्याहस्ते नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या नूतन कार्यालयाचे उदघाटन
नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे नूतन कार्यालय द्वारका नाशिक येथे
उभारण्यात आले आहे. आज पद्ग्रहक सोहळ्याच्या निमित्ताने केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ.भारती पवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

अशी आहे नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनची नूतन कार्यकारिणी

अध्यक्षपदी राजेंद्र फड, वरिष्ठ उपाध्यक्षपदी पी.एम.सैनी
सल्लागारपदी जे.पी.जाधव, सुनील बुरड, प्रदीप जोहर, दादा देशमुख, अमरनाथ मिश्रा, महावीर मित्तल, हरनारायण अग्रवाल,ईश्वर बन्सल, क्रीपाशंकर सिंह,रामराम सूर्यवंशी, जयपाल शर्मा, राजेश सिंघल, जगदीश इंदोरीया, दलबीर प्रधान, मोतीलाल चंदा,
उपाध्यक्षपदी आडगाव महेंद्र राजपूत, अंबड अमोल शेळके, अंबड सुभाष जागंडा, सातपूर किरण आव्हाड,सातपूर सदाशिव पवार, नाशिकरोड दिपक ताकाटे, शिंदे सतीश कलंत्री, सिन्नर सुनील धाने, मुंबई नाका हॅपी चंदा, गुजरात रोड शक्ती सिंग, द्वारका सुनील जागंडा, संजय राठी, विल्होळी सुलेमान सय्यद, निकीतेश धाकराव, पंचवटी संजय तोडी, पिंपळगाव जेताभाई,

जनरल सेक्रेटरीपदी शंकर धनावडे, मनोज पारीख
खजिनदारपदी बजरंग शर्मा, भगवान कटारिया,
जॉइंट सेक्रेटरीपदी विशाल पाठक, नाना पाटील, दिपक ढिकले, राजेश शर्मा,
जनसंपर्क प्रमुख संदीप बिर्ला,दिपक पांडे, मनोज उदावंत, शरद खालेकर, गणेश नागरे,
आर्थिक सल्लागार सुनील जागंडा, क्रीडा सल्लागार रोहित सुराणा, तेजपाल सोडा,
कार्यकारी समिती सदस्यपदी माणिक मेमाणे, दलजीत मेहता, शरद जगताप, विनोद चौधरी, सौनू शर्मा, प्रवीण साबळे, चेतन देशमुख, गणेश बोरसे, दुर्गेश मिश्रा, गजानन सोसे, पी.एम.खाबिया, वनिता हिंगे, नाना लभडे, अक्षय वाघ, हर्षत शेख, मयूर तिडके, ईश्वर सोनवणे, रविकांत शर्मा, जनार्दन खाडे, बाळासाहेब मुंगळे, शिवाजी मटाले, रौनक विग, विलास लहामगे
तक्रार समितीसदस्यपदी महेंद्रसिंह राजपूत, संजय राठी, रामभाऊ सूर्यवंशी, सदाशिव पवार, किरण आव्हाड,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *