कोपरगाव तालुक्यात ० ते ५ वयोगटातील ३१२०५ बालकांना पोलिओ डोस पाजनेत आला:- तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यात ० ते ५ वयोगटातील ३१२०५ बालकांना पोलिओ डोस पाजनेत आला. ९७.१५ टक्के बालकांनी आज पोलिओ डोस घेतला आहे. आज पोलिओ डोस लसिकरणास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कोळपेवाडी आरोग्य उपकेंद्र येथे मा. सभापती पोर्णिमाताई जगधने यांचे हस्ते पोलिओ बुथचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते उपस्थित होते. प्रा. आ. केंद्र संवत्सर येथे मा. राजेश आबा परजने जि. प. सदस्य,

प्रा. आ. केंद्र चासनळी येथे मा. सुधाकर अण्णा दंडवते तसेच विविध प्रा. आ. केंद्र, आरोग्य उपकेंद्र येथे मा. उपसभापती अर्जुन दादा काळे, जिल्हा परिषद सदस्य ,पंचायत समिती सदस्य या मान्यवरांच्या हस्ते पोलिओ बुथचे उद्घाटन करणेत आले.
येत्या चार दिवसांत आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन पोलिओ डोस घेतलेल्या बालकांची खात्री करनार आहेत आणि सुटलेल्या बालकास डोस पाजणार आहेत.

डॉ.संतोष विधाते
तालुका आरोग्य अधिकारी
पं. समिती कोपरगाव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *