श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयांत भागचंदभाऊ ठोळे यांची जयंती उत्साहाने संपन्न…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगांव शहरांतील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत शनिवार १९मार्च २२ स्व.भागचंद ठोळे यांची जयंती उत्साहाने संपन्न झाली.
श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात भागचंदशेठ ठोळे यांच्या प्रतिमेचे पुजन विदयालयांचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
या वेळी विदयालयाचे चेअरमन चंद्रकांत ठोळे, कोपरगांव एज्युकेशन सोसा.अध्यक्ष कैलास ठोळे ,सचिव दीलीप अजमेरे ,सहसचिव सचिन अजमेरे,सदस्य राजेश ठोळे,संदीप अजमेरे आदी मान्यवरांनी भागचंदशेठ ठोळे यांना जयंती निमित्तानं अभिवादन केले. विदयालयाचे पर्यवेक्षक आर.बी.गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
विद्यालयाचे शिक्षक एस.डी.गोरे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.
कोपरगावचे उद्योगपती,जेष्ठ नागरीक संघाचे सर्वसर्वा,दानशुर व्यक्तीमत्व, सर्व जातीजमातीतील,व्यापारी मंडळी,शैक्षणिक संस्था इ.चे संस्थाचे आश्रयदाते,भागचंदभाऊ चे नाव कायम स्मरणात राहील असे श्री.एस.डी.गोरेसरांनी आपल्या आठवणीत स्पष्ट केले. जेष्ठ शिक्षिका श्रीमती यु.एस.रायते यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला जेष्ठ शिक्षक तुपसैंदर डी.व्ही,ए.बी.अमृतकर,एन.के.बडजाते,इ.एल. जाधव ,ए.जे.कोताडे, एस.एन.शिरसाळे,आर.आर.लकारे आदी शिक्षक, सोशल डीसटन्स पाळुन उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *