शेतकऱ्यांच्या हितासाठी रिझर्व्ह बँक विरोधात मोर्चा नेणारे शंकरराव कोल्हे ऐतिहासिक साक्षीदार:- सदाशिव लोखंडे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
शेतकऱ्यांच्या शेती कर्जाचे व्याजदर कमी झाले पाहिजे म्हणून माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी भारतीय रिझर्व बँकेच्या विरोधात रुमणे मोर्चा नेऊन शेतकऱ्यांना कर्जाच्या व्याजदरात दोन टक्के सवलतीचा निर्णय मिळवून दिला या मोर्चाचे ते ऐतिहासिक साक्षीदार होते असे प्रतिपादन शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे व शिवसेनेचे नेते खासदार सदाशिव लोखंडे यांनी केले.
कोल्हे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट शुक्रवारी खासदार लोखंडे यांनी येसगाव येथे घेतली त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास जाधव, ग्रामीणचे उपाध्यक्ष प्रमोद लबडे, तालुका अध्यक्ष शिवाजी ठाकरे, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, गटनेते योगेश बागुल, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब राहणे, माजी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव, माजी शहरप्रमुख सनी वाघ, ग्राहक संरक्षण कक्ष शहराध्यक्ष रवी कथले, सागर जाधव, नितीश बोरुडे, सिद्धार्थ शेळके, आशिष निकुंभ, ज्ञानेश्वर गोसावी, पप्पू पडियार, कुणाल लोणारी आदी पदाधिकारी व शिवसैनिक हजर होते.
खासदार सदाशिव लोखंडे पुढे म्हणाले की, शंकरराव कोल्हे यांनी राज्याचे नेतृत्वाला दिशा देत सहकारात मोठे काम उभे केले आहे, त्यांच्या निधनाने शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे सुपुत्र हरपले आहे. शेतकऱ्यांच्या कामाची श्रद्धा आणि साईबाबांच्या पुण्यभूमि तून जनसामान्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात कोल्हे वाकबगार होते.

फोटो ओळी:- कोपरगाव
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी येसगाव कोल्हेवस्ती येथे येऊन कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *