कोपरगाव शहराच्या समस्या सोडविण्या साठी प्रशासन लोक प्रतिनिधी गंभीर नाही:-अँड.नितीन पोळ…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहर व तालुक्यातील विविध समस्या सोडवणे करिता कोपरगाव तालुक्याचे प्रशासन गंभीर नाही असे मत लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी व्यक्त केले
लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने एक दिवशीय धरणे आंदोलन दि २६ जानेवारी २०२१ रोजी तहसील कार्यालय कोपरगाव या ठिकाणी लोक स्वराज्य धरणे आंदोलन करण्यात आले
कोपरगाव शहर व तालुक्यातील खालील प्रमाणे मागण्या प्रशासनाकडे करण्यात आल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते छ संभाजी महाराज स्मारक रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा कोपरगाव शहरातील विस्थापित टपरी धारकांना खोका शॉप चे वाटप त्वरित सुरू करावे
कोपरगाव शहरातील पिण्याच्या पाण्याची उन्हाळ्या तील संभाव टंचाई दूर करण्यासाठी उपाय योजना करावी कोपरगाव कोर्टा शेजारी असलेल्या Dysp कार्यालयाची जागा परत घेऊन वकिलांना ऑफिस साठी गाळे व व्यापारी संकुल बांधण्यात यावे कोपरगाव शहरातील सरकारी जागेवर अतिक्रमण केलेल्या झोपडपट्टी धारकांना त्वरित सातबारा उताऱ्याचे वाटप करण्यात यावे, कोपरगाव नगर पालिकेच्या मंजूर केलेल्या कामाची शासकीय अंदाज पत्रक तयार करून सदर कामास त्वरित सुरुवात करण्यात यावी कोपरगाव शहर व तालुक्यातील मटका जुगार,बेकायदेशी दारू धंदे त्वरित बंद करण्यात यावे कोरोना साथीच्या कालावधी तील सर्व शासकीय कर,घरपट्टी, वीजबिल,शेतसारा इ कर माफ करण्यात यावेत
या मागण्यांसाठी यापूर्वी लोक स्वराज्य आंदोलन व विविध संघटनानी वेळोवेळी प्रशासनाकडे मागणी केली मात्र यापूर्वी देखील शहराच्या नागरी समस्या सोडण्यासाठी प्रशासन सकारात्मक नाही म्हणून आज एक दिवसीय धरणे आंदोलन केले मात्र नगर पालिकेच्या अखत्यारीत असलेले विषय असताना देखील नगर पालिका प्रशासनाने व लोक प्रिय नगराध्यक्ष यांनी धरणे आंदोलना कडे पाठ फिरवली दरम्यान कोपरगाव शहरातील अनेक सामाजिक संघटना व प्रतिनिधी यांनी या आंदोलनास पाठिंबा दिला असून लोक प्रतिनिधी व प्रशासन गंभीर नसल्याने रोष व्यक्त केला असून या समस्या सोडविण्या साठी प्रशासन गंभीर नसेल तरी जनतेच्या प्रश्नासाठी वेळ प्रसंगी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला, तहसीलदार मा योगेश चंद्रे या आंदोलना ला भेट देऊन आंदोलन कर्ते सोमनाथ म्हस्के, सुजल चंदनशिव अकबर पटेल,निसार शेख बाळू पवार यांच्या सोबत सकारात्मक चर्चा केली बिपीन दादा कोल्हे, आमदार आशुतोष दादा काळे, संदीप वर्पे,पराग संधान , कैलास भाऊ जाधव, सागर आहेर, डी आर काले,अजय विघे, विजय त्रिभुवन,देवराम पगारे, जितेंद्र रणशुर, गौतम बनसोडे,बापू काकड़े, विनोद राक्षे , शरद त्रिभुवन,राजेंद्र बागुल, सलीम पठान, महमूद सय्यद, शपिक भाई सय्यद,संपत चंदनशिव, किरण थोरात,शंकर बिऱ्हाडे, सतिष चव्हाण सोमनाथ ताकवले,गोरख देव्हडे आदींनी पाठिंबा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *