
कोपरगाव प्रतिनिधी
(नाशिक):-
नाशिक जिल्ह्यासाठी भरभरून तरतूद केल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे मन:पूर्वक आभार !
नाशिक जिल्ह्यात आदिवासी उद्योग क्लस्टरसाठी सुमारे २५ कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पातील ८०% खर्च उचलण्यासाठी या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. तसेच फ़िजिओथेरिपी केंद्र देखील येथे उभारण्यात येणार आहे. नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात मराठी भाषा भवन उभारण्यासाठी सुमारे १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील युवक, तरुण उद्योजक व आदिवासी बांधवांना त्यांच्या क्षेत्रात निश्चितच चालना मिळणार आहे.
महाविकास आघाडीचा अर्थसंकल्प हा सर्व समावेशक असून सर्व घटकांना आशादायी असा अर्थसंकल्प आहे. कृषी, कृषी उद्योग, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण, उद्योग या पंचसुत्रीला बळकटी देणारा अर्थसंकल्प महाविकास आघाडी सरकारने सादर केला आहे.
राज्यातील गड व किल्ले यांच्या सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला असल्याने तरुण पिढीस शिवस्वराज्यातील गड व किल्ले अनुभवता येणार आहे.
शेतकऱ्यांना मोठा दिलासा या अर्थसंकल्पात दिला आहे. नियमित कर्ज फेड करणाऱ्या राज्यातील शेतकरी बांधवांना ५० हजार प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. कृषी विभागासाठी ३०२५ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावीत करून अस्मानी संकटांने अडचणीत येणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्यातील सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी १३२५२ कोटी रुपयांच्या निधीची तरतुद करून जलसंधारणाचे काम हाती घेतले आहे. येत्या दोन वर्षात १०४ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचे ध्येय महाविकास आघाडी सरकारचे आहे.
तरुणांना विशेष संधी निर्माण करून देण्यासाठी १०० कोटी रुपयांचा स्टार्टअप निधी तसेच कौशल्य रोजगार उद्योजकतेसाठी ६१५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करून बेरोजगार तरुणांच्या हितासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
एकूणच सर्व समावेशक असलेला अर्थसंकल्प महाविकास आघाडीच्या वतीने सादर करण्यात आला आहे.
ॲड. रविंद्रनाना पगार
जिल्हाध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस, नाशिक
