कोल्हे कुटूंबाचा निष्ठावंत मावळा मुकुंदमामा काळे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
एका सर्वसामान्य कुटूंबात जन्मलेल्या मुकुंद किशोर काळे या तरुणाची जिद्द मोठी आहे.पायाने दिव्यांगत्व आलेले असतांना जगण्याची जिद्द स्वस्थ बसू देत नाही हा विचार कायम जिवंत ठेवला.माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब,संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री.बिपीनदादा कोल्हे,भाजपा प्रदेश सचिव मा. आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे व युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या सानिध्यात जनसेवेचे व्रत हा तरुण जोपासतो आहे.
कोल्हेताई यांच्या विधानसभा सदस्य काळात दिव्यांग व त्यांचे हक्क अधिकार यांची जाणीव खऱ्या अर्थाने समाजाला झाली.कोल्हे कुटुंबियांनी मुकुंदमामा काळे या कार्यतत्पर मावळ्यावर विश्वास दाखवत भाजपा दिव्यांग सेलची तालुकाध्यक्ष पदाची धुरा दिली ती आज तागायत यशस्वीपणे ते सांभाळत आहेत.
संपर्कात असलेल्या माणसाचा मोबाईल नंबर आपल्याकडे जोडून घेणे,त्यांचा वाढदिवस आवर्जून आठवणीत ठेवणे व वाढदिवसाला त्या व्यक्तीची भेट घेऊन सत्कार करणे असा दिनक्रम रोज सुरू असतो व कुणाचा वाढदिवस साजरा करत नाही असा एकही दिवस येत नाही.तळेगाव मळे येथील शनी मंदिरात न चुकता 181 शनिवार जाणारा हा जिद्दी माणूस.अडल्या नडल्या माणसाला मदतीला धावून जायचे या युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या कार्यपद्धतीचा प्रभाव या शिलेदारावर असून अतिशय जोमदारपणे आपले काम करत आहे.
समाज माध्यमावर अतिशय सक्रिय असणारे हे व्यक्तिमत्व अनेकांच्या उपयोगी पडते.कुणाच्या नातेवाईकात दुःखद घटना घडली तर प्रथम सर्वांना माहिती देणे त्या कुटूंबाच्या दुःखात हजर राहणे,दिव्यांग व गरजू व्यक्तींना नेतृत्वापर्यंत पोहचवून त्यांचे प्रश्न तडीस लावणे असे सर्वांना सुपरिचित असणारे हे व्यक्तिमत्व सर्वांच्या मनात मुकुंदमामा या नावाने घर करून कार्य करत आहे.

लहान मोठे सर्वांना आपला मित्र वाटावा असे काम मुकुंदमामा काळे यांचे सुरू आहे त्यांचे आज अभिष्टचिंतन आहे.त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *