कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतिने पो.स.ई. भरत नांगरे यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार तर, अँड योगेश खालकर यांची कायदेशिर सल्लागार पदी नियुक्ती मंजूषा सुरवसे यांचा सन्मान…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या नुकतीच ५ फेब्रुवारी २०२२ रोजी कोपरगाव शहरात बैठक संपन्न झाली असुन विविध विषयावर चर्चा विनिमय करण्यात आले आहे.कोपरगाव तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या प्रश्नावर तालुका अध्यक्ष प्रा. साहेबराव दवंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक उत्साहात पार पडली.कोपरगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस उपनिरिक्षक भरत चिंतामणी नागरे यांना सन २०१८ मध्ये नक्षलवादी कारवायांचा खात्मा करण्यासाठी केलेल्या शौर्याबद्दल राष्ट्रपती शौर्य पुरस्कार देण्यात आला आहे या प्रसंगी पो.स.ई.भरत नागरे यांना नुकताच त्यांच्या धाडसी उत्कृष्ट कामगिरी बद्दल राष्ट्रपती शौर्य पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतिने सत्कार करण्यात आला.त्याचबरोबर अँड योगेश खालकर यांची कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या कायदेशीर सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली आहे.डाँ.सी.एम कन्या विद्यालयच्या मुख्यध्यापीका मंजुषा सुरवसे यांना आदर्श मुख्यध्यापिका पुरस्कार नुकताच प्राप्त झाला आहे.त्यामुळे त्यांचाही सन्मान कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतिने करण्यात आला आहे. यावेळी प्रा.साहेबराव दवंगे, डाँ.अरुण गव्हाणे,युसुफ रंगरेज , रोहित टेके,लक्ष्मण जावळे, सोमनाथ सोनपसारे,योगेश डोखे,शैलेश शिंदे,संतोष जाधव,मोबिन खान,रवींद्र जगताप ,राजेंद्र गाडे,अक्षय खरात आदी पत्रकार संघाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *