
कोपरगाव प्रतिनिधी :- ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय युवा भुषण पुरस्कार कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते निसार शेख यांना नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात पद्मश्री पुरस्कार प्राप्त बीजमाता राहीबाई पोपेरे,राजेंद्रबापू जाधव मा. व्हा .चेअरमन महानंदा दूध संघ मुंबई ,पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,दौलतराव जाधव,वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसुंदर ,संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ डफाळ व संस्थेचे पदाधिकारी यांचे उपस्थितीत प्रदान करण्यात आला.निसार शेख हे मागील काही वर्षांपासून सामाजिक काम करत असुन शहरातील वाढीव भाग जोडलेल्या भागाचा विकास करण्यात यावा यासाठी सातत्याने काम करत आहे. सामाजिक, शैक्षणिक ,सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा मोठा सहभाग असुन गोर गरिब शोषित पिडीत कष्टकरी नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेत असतात.त्यांच्या या कार्याची दखल घेवुन त्यांना राज्य स्तरीय युवा भुषण पुरस्कार प्रदान केला आहे.त्यामुळे त्यांचे कोपरगावात ठिकठिकाणी अभिनंदन करुन शुभेच्छा देण्यात येत आहे
