दिलेला शब्द पूर्ण केला, कोपरगाव शहरातील विकासाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी नगरपालिकेची सत्ता द्या:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- आमदार झाल्यानंतर बार असोसिएशननच्या वतीने सत्कार करून न्यायालयाच्या इमारतीच्या अडचणी मांडल्या होत्या. त्यावेळी न्यायालयाच्या इमारतीसाठी निधी देण्याचा शब्द दिला होता. दिलेला शब्द पूर्ण करून न्यायालयाच्या इमारतीसाठी निधी देवून तुमच्या विश्वासाला पात्र ठरलो आहे. मी दिलेला शब्द पूर्ण केला आहे. कोपरगाव शहरातील विकासाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी नगरपालिकेची सत्ता देऊन तुम्ही तुमची जबाबदारी पूर्ण करा असे आवाहन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी केले.

        कोपरगाव दिवाणी न्यायालय ('क' स्तर, व स्तर) नवीन इमारत बांधकामासाठी ३८ कोटी ६३ लक्ष रुपये निधी मंजूर करून आणल्याबद्दल व श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कोपरगाव बार असोसिएशनच्या वतीने आ.आशुतोष काळे यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते.

        पुढे बोलतांना ते म्हणाले की,विधानसभा निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करून पाच नंबर साठवण तलावाला १२० कोटींची तांत्रिक मंजुरी मिळवून दिली व पुढील मंजुरी लवकरात लवकर मिळविण्याची जबाबदारी माझी आहे.कोर्टाच्या बाबतीतल्या देखील अडचणी सोडविल्या आहे. शहर विकासासाच्या बाबतीत अजूनही अडचणी आहेत त्यासाठी आपण वारंवार प्रश्न मांडले होते. मात्र यापुढे फक्त प्रश्न मांडून थांबता येणार नाही ते सोडविण्यासाठी नगरपालिकेची सत्ता अत्यंत महत्वाची आहे. शहराविकासाठी महाविकास आघाडी सरकारकडून जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी मी समर्थ आहे परंतु आणलेला निधी खर्च करण्यासाठी राष्ट्रवादीच्या ताब्यात सत्ता असणे आवश्यक आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या ताब्यात नगरपालिकेची सत्ता राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून विकासकामे करून घेण्याची मी जबाबदारी घेतो तुम्ही तुमची जबाबदारी पूर्ण करा असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले. यावेळीअॅड. आर.एस. जपे, अॅड. एस.एस. धोर्डे, अॅड. पी.सी. कडू, यांनी आपले मनोगत व्यक्त करून न्यायालयाच्या इमारतीसाठी निधी दिल्याबद्दल आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले.

            यावेळी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, नगरसेवक, गटनेते विरेन बोरावके, हाजी मेहमूद सय्यद रमेशजी गवळी फकीर कुरेशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.आर. पाटील, उपअभियंता प्रशांत वाकचौरे, बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विद्यासागर शिंदे, अॅड. गणेश भोकरे, अॅड. प्रशांतजी वाकचौरे, अॅड. आर.एस. जपे, अॅड. एस.एस. धोर्डे, अॅड. पी.सी. कडू, अॅड. एस.जे. देशमुख, अॅड. एस.बी. लोहकणे, अॅड. जी.बी. मोकळ, अॅड.सौ. मंजिरी देशमुख, अॅड.एस.बी. रक्ताटे, अॅड. योगेश खालकर, अॅड. सुयोग जगताप, अॅड. महेश भिडे, अॅड. जी.बी. भवर, अॅड.बाबसाहेब सोनवणे, अॅड.नितीन खैरनार, अॅड.एम.पी. येवले, अॅड. नितीन पोळ, अॅड.एस.एस. भोकरे, अॅड. व्ही. जी. सदाफळ, अॅड.एम. एल. मोरे, अॅड.सौ. व्ही. के. देशमुख, अॅड. सौ. एस. एन. पोळ, अॅड.बी.ए. सोनवणे, अॅड. आतिश आगवन, अॅड. एस. एस. शेख, अॅड.देवकर, अॅड.टेके, अॅड. एस. जी. गुरव, अॅड. मुन्ना सय्यद, अॅड.आर. सी. गव्हाणे, अॅड. केतन शिरोडे, अॅड. जी.जी. गुरसळ, अॅड.व्ही.जी. गवांदे, अॅड. एस.डी. काटकर,बार सहाय्यक देवकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विद्यासागर शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार अॅड.गणेश भोकरे यांनी मानले.

फोटो ओळ:-
कोपरगाव बार असोसिएशनच्या वतीने आ. आशुतोष काळे यांचा सत्कार करतांना बार असोसिएशन पदाधिकारी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *