पुन्हा कोपरगाव मध्ये गोवंश हत्या होऊ नये यासाठी प्रशासनाबरोबरच सर्व जनतेनेही सावध रहाणे:- नगराध्यक्ष विजय वहाडणे…

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:- गोवंशप्रेमींच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर काल कोपरगाव शहरातील बेकायदा कसाईखाने, शेड, of आडोसे हटविण्यात आल्याने शहरात सर्व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पुन्हा गोवंश हत्या होऊ नयेत यासाठी आता प्रशासनाबरोबरच सर्व जनतेनेही सावध रहाणे फारच गरजेचे आहे.
तीन वर्षांपूर्वी झालेल्या मोठ्या कारवाईत जवळपास 350 गोवंश जप्त करण्यात आले होते. त्यातील बहुतांश जनावरे ही बैलबाजारच्या मैदानात व परिसरात ठेवलेली होती. आता मी कोपरगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व संबंधित अधिकारी-पदाधिकारी व नेत्यांना जाहीरपणे इशारा देऊन ठेवतो कि, गुरांचा (जनावरांचा) आठवडे बाजार भरतो त्याठिकाणी अनधिकृत गोवंश ठेवलेले आढळल्यास कोपरगावात निर्माण होणाऱ्या असंतोषास संबंधिताना तोंड द्यावे लागेल हे लक्षात घ्यावे. यानंतर गोवंशहत्या करणाऱ्या कसायांची अनधिकृत जनावरे पैसे घेऊन या जागेत ठेवली असे लक्षात आल्यास अनर्थ होईल यात कुणीही शंका बाळगू नये.
यानंतर या विषयावर कुणी निवेदन-अर्ज-विनंत्या करण्याची कृषी उत्पन्न बाजार समितीने वाट पाहू नये. शहरातील वातावरण बिघडणार नाही याची जबाबदारी बेकायदेशीर-चुकीचे काम करणाऱ्यांची आहे याचे भान अधिकारी-पदाधिकारी-नेते ठेवतील अशी अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *