
कोपरगाव प्रतिनिधी:- जेष्ठ नागरिक सेवा मंचचे संस्थापक अध्यक्ष कै भागचंदभाऊ ठोळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ना नफा ना तोटा तत्त्वावर उत्कृष्ट दर्जाचे दिपावली फराळ विक्री आजतागायत सुरू आहे
कै दगडू महाराज उपाध्ये यांचे कुटुंबीय आणि जेष्ठ नागरिक सेवा मंचचे वतीने उत्कृष्ट दर्जाचे दिपावली फराळ चांगला कच्चा माल वापरून तयार केलेले पदार्थ विक्री साठी उपलब्ध आहेत
कृष्णाई मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या फराळ विक्री शुभारंभ प्रसंगी डॉ संकेत मुळे चार्टर्ड अकौंटट एस एल कुलकर्णी चंद्रकांत बजाज सर योगेश जोबनपुत्रा सतीश गुजराथी युसुफ रंगरेज सौ उमाताई वहाडणे आदि मान्यवर उपस्थित होते स्वागत प्रास्ताविक विजय बंब यांनी केले रामू महाराज उपाध्ये शामू आनंद यांनी उपक्रमाची माहिती दिली कासलीवाल सर नेने कोरहाळकर यांनी मनोगत व्यक्त केले उत्तमभाई शहा यांनी आभार मानले
ना नफा ना तोटा तत्त्वावर दिपावली फराळ विक्री सुरू झाल्याने समाधान व्यक्त केले आहे घर सोडून कर्तव्य निभावणारे पोलिस एस टी चालक वाहक रेल्वे स्टेशन आदि ठिकाणी जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या वतीने फराळ देण्यात येतो आणि दिपावली आनंद साजरा केला जातो
