
कोपरगाव प्रतिनिधी (शिर्डी):- राज्य शासनाच्या पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजने अंतर्गत सन 2021-22, 2022-23 व 2023-24 (आंबिया बहार) करिता कोपरगांव तालुक्यातील आंबा, डाळींब व द्राक्ष या फळ पिकांच्या विमा संरक्षणासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांनी केले आहे.
सदर योजना सन 2021-22 पासून कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. जमीन भुधारणेच्या मर्यादेत एका शेतक-यास अधिसूचित फळपिकासाठी 4.00 हेक्टर मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करता येईल, केवळ उत्पादनक्षम फळबागांसाठी विमा संरक्षणाचे कवच राहणार आहे. आंबिया बहारात सहभागी झालेल्या शेतक-यांसाठी गारपीठ ( Add on cover ) या हवामान धोक्यासाठीचा सहभाग ऐच्छिक राहील व याकरिता अतिरिक्त विमा हप्ता देय आहे. तसेच ज्या शेतक-यांना गारपीट या हवामान धोक्याकरिता सहभाग नोंदवावयाचा असेल अशा शेतक-यांनी त्यांचा नियमित व अतिरिक्त विमा हप्ता भरणे आवश्यक आहे. डाळींब या फळपिकासाठी 14 जानेवारी 2022, द्राक्षसाठी 15 ऑक्टोंबर 2021 व आंबा करिता 31 डिसेंबर 2021 हप्ता भरणेची अंतिम मुदत असणार आहे. सदर पीक संरक्षणाचा लाभ घेण्यासाठी सादर करावयाचा अर्ज व विमा हप्ता common service center (CSC) किंवा बॅंके मार्फत ऑनलाईन पध्दतीने सादर करावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 7/12 व 8 अ चा खाते उतारा, पीक पेरणी दाखला (स्वयंम घोषणापत्र), आधारकार्ड झेरॉक्स, बॅंक पासबुक छायाप्रत असे कागदपत्रे आवश्यक आहेत.
सदर योजनेसाठी कोपरगांव तालुक्या करिता ‘रिलायन्स जनरल इन्शुरन्स’ या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. या योजनेविषयी शंका- समाधनासाठी ग्राहकसेवा क्रमांक 18001024088 किंवा 022/68623005 वर संपर्क साधावा. या योजने संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. असे ही कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांनी सांगितले.
विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता खालीलप्रमाणे-
अ.क्र.
फळ पीक
शेतकऱ्यांनी भरावयाची विमा हप्ता रक्कम प्रति हेक्टर (5 टक्के)
विमा हप्ता रक्कम भरावयाची अंतिम तारीख
फळपीक उत्पादनक्षम वय
नियमित
गारपीट
एकूण विमा हप्ता
1
आंबा
17500
2333
19833/-
31 डिसेंबर 2021
5 वर्ष
2
डाळींब
6500
2167
8667/-
14 जानेवारी 2022
2 वर्ष
3
द्राक्ष
16000
5333
21333/-
15 ऑक्टोंबर 2021
2 वर्ष
