के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा समाधान वाव्हळ हिंदी काव्यवाचन स्पर्धेत प्रथम…

कोपरगाव प्रतिनिधी:-स्थानिक के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी समाधान वाव्हळ याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित विद्यापीठस्तरीय स्वरचित हिंदी काव्यवाचन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मानाचा करंडक प्राप्त केला आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. बी एस यादव यांनी दिली.डॉ. यादव पुढे म्हणाले […]

Read More

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे ‘मा. बाळासाहेब (भाऊ) देवराम वाघ मेमोरिअल लाईफटाईम अचिव्हमेंट अवार्ड’ ने सन्मानित विनाअनुदानित संस्थांच्या राज्यस्तरीय संघटनेकडून कार्याची दखल…

कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी ग्रुप ऑफ अन्स्टिट्यूट्सचे (एसजीआय) अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे यांची एसजीआय संचलित संजीवनी इंजिनिअरींग काॅलेज व पाॅलीटेक्निक संस्थांची देश पातळीवरील विविध उपलब्धी विचारात घेवुन त्यांच्या विशेषतः अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल घेवुन असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंटस् ऑफ इंजिनिअरींग काॅलेजेस, असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंटस् ऑफ पाॅलीटेक्निक्स आणि असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंटस् ऑफ अॅग्रीकल्चर […]

Read More

चास (नळी) येथील कै सुगंधाबाई त्र्यंबक चांदगुडे स्मरणार्थ निबंध स्पर्धेत अनुष्का भाकरे प्रथम तर श्रद्धा शेळके द्वितीय विजेती…

कोपरगाव प्रतिनिधी:- चास (नळी) येथील कै सुगंधाबाई त्र्यंबक चांदगुडे स्मरणार्थ निबंध स्पर्धा घेण्यात आली. यात दगडुजी पाटील तिडके विद्यालयातील विद्यार्थीनींनी भाग घेतला . इयत्ता दहावीची विद्यार्थीनीकु. भाकरे अनुष्का दत्तात्रय हिने प्रथम क्रमांक मिळवला तर कु. शेळके श्रद्धा सुरेश हिने द्वितीय तर कु. सानप हर्षदा सतिश हिने तृतीय क्रमांक मिळवला. यशस्वी विद्यार्थीनींना रोख रक्कमव प्रशस्तिपत्र यांचे […]

Read More

मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक येथील कार्यालयात शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा ; मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन…

अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानचे मानबिंदू:- मंत्री छगन भुजबळ…कोपरगाव प्रतिनिधी(नाशिक):- अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य स्थापना करणारे बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे मानबिंदू असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.मंत्री छगन भुजबळ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष […]

Read More

संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूल मधील विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षेत सुयश…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव येथील नावाजलेल्या संजिवनी इंग्लिश मिडीयम स्कूल मधील दोन विद्यार्थी अनुक्रमे कुमारी श्रावणी रणजित महाले.. इयत्ता 9 वी आणि कुमार ईशान अभय सीन्हा वरकड इयत्ता 6 वी यांनी अहमदनगर जिल्हा गणित व विज्ञान आणि तंत्रज्ञान स्पर्धा परीक्षेत कोपरगांव केंद्रात घवघवीत यश संपादन केले असून कोपरगांव केंद्रात अनुक्रमे दुसरा व नववा क्रमांक मिळऊन शाळेच्या नावलौकिकात […]

Read More

स्त्री आणि धर्माविषयाची दृष्टी समतेची ठेवण्याची छत्रपती शिवरायांची शिकवण :- डाॅ. श्रीपाल सबनीस जेष्ठ सुप्रसिद्ध साहीत्यिक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-स्त्रीयांबद्दलचा आदर भाव, कमालीची नैतिकता व धर्मातीत राजकारण या गोष्टी आजच्या काळासाठी फार गरजेच्या व महत्वाच्या आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः त्याबद्दल एक आदर्श घालून दिला आहे. शिवरायांनी नेहमी स्त्रियांना सन्मानाची वागणूक दिली. तसेच त्यांचे राजकारण हे नेहमी धर्माच्या पलीकडचे राहील अशा प्रकारची स्त्री व धर्माविषयीची समतेची दृष्टी ठेवण्याची शिकवण छत्रपती शिवरायांची होती […]

Read More

“छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (शासकीय) उत्साहात साजरी…”

कोपरगाव प्रतिनिधी:-छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने सोमवार दि.१९/०२/२०२४ रोजी जल्लोषात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पहाटे ५.३० वा. महामस्तकाभिषेकचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी , उपमुख्याधिकारी मनोजकुमार पापडीवाल यांच्यासह नगरपरिषद शिक्षण मंडळाचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक वृंद अशा एकूण ११ उभयंताच्या शुभहस्ते […]

Read More

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन सुराज्य निर्मितीसाठी कार्यरत राहू:- विवेकभैय्या कोल्हे ; शिवजयंतीनिमित्त विवेकभैय्या कोल्हे यांचे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे अभिवादन…

कोपरगाव प्रतिनिधी:- छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल प्रशासक, समतेचे पुरस्कर्ते, आदर्श नीतिवंत राजे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ मांसाहेब यांच्या प्रेरणेने विविध जाती-धर्मातील लोकांना एकत्र करत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सुराज्य कसे निर्माण करावे, राज्य कसे चालवले पाहिजे, याचा आदर्श त्यांनी संपूर्ण जगाला घालून दिला. सर्व राज्यकर्त्यांनी आणि युवा पिढीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा […]

Read More

कोपरगावच्या इतिहासात प्रथमचछत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी ;छत्रपती शिवाजी महाराज अथक संघर्ष, अविचल जिद्द आणि अतुलनीय नेतृत्वाची गाथा:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अखंड हिंदुस्थानाचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांनी केलेला संघर्ष आजही प्रत्येक शिवप्रेमींच्या मनात खोलवर रुजलेला आहे. स्वराज्याचे स्वप्न पाहून मुठभर मावळ्यांच्या मदतीने हे स्वप्न सत्यात उतरविणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, पराक्रम त्यांचा आदर्श व कर्तुत्व हे केवळ मराठी माणसांसाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी स्फूर्तीचा अखंड झरा आहे. […]

Read More

कोपरगावात प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून होणार पुष्पवृष्टी:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोमवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टर मधून पुष्प वृष्टी करण्यात येणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.कोपरगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शिवजयंती उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने […]

Read More