साखर उद्योगाला आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यासाठी साखर धोरणांमध्ये सातत्य ठेवणे आवश्यक:- आ. आशुतोष काळे ; कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या ६९ व्या विक्रमी गळीत हंगामाची उत्साहात सांगता…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- आंतरराष्ट्रीय स्तरावर साखरेचे दर चांगले असतांनाही २०२३-२४ च्या गळीत हंगामात ऊस उत्पादन कमी राहील या अंदाजावर केंद्र शासनाने साखर निर्यातीला परवानगी दिली नाही. त्यामुळे चांगले दर असतांना देखील साखर निर्यात होवू शकली नाही. गाळप हंगाम सुरु झाल्यानंतर एक महिन्यातच केंद्र शासनाने बी. हेवी ज्युस पासूनच्या इथेनॉल निर्मितीला बंदी घालत फक्त सी. […]

Read More

शिर्डी लोकसभा निवडणूक- २०२४,शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी दि. १८ एप्रिल पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरूवात ; पहिल्या दिवशी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचे प्रमाण निरंक १८ उमेदवारांनी ३१ अर्ज घेतले…

कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत ३८ शिर्डी (अनुसूचित जाती) लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात सोमवार, दिनांक १३ मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी उमेदवाराकडून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया आज, गुरुवार दिनांक १८ एप्रिल पासून सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने नामनिर्देशन पत्र अर्ज दाखल केला नाही. पहिल्या दिवशी १८ उमेदवारांनी ३१ अर्ज […]

Read More

साईपालखी रस्त्यावर स्वच्छतेसाठी कचरापेटी सूर्यतेज संस्थेचा उपक्रम, ज्योती पतसंस्था व साईभक्तांचा सहभाग…

कोपरगाव प्रतिनिधी:-सूर्यतेज संस्था,कोपरगांव वतीने ज्योती पतसंस्था कोपरगाव यांचे सहभागातून स्वच्छ भारत अभियान,वन महोत्सव स्वच्छता-जलशक्ती- वृक्षारोपण आणि पर्यावरण अभियान अंतर्गत श्री रामनवमी उत्सव निमित्ताने कोपरगांव ते शिर्डी रस्त्यावर सलग दहाव्या वर्षी भाविकांना खाद्य व पेय पदार्थ वाटप केंद्रावर मोफत कचरापेटी उपलब्ध करून दिली आहे. सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली सूर्यतेज संस्थेच्या अभियानाला बी.एस.एन.एल.चे […]

Read More

संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने साई भक्तांना सुगंधी दूध वाटप ;श्री राम नवमीनिमित्त युवा नेते श्री.विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम…

कोपरगाव प्रतिनिधी:-प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जन्मोत्सवानिमीत्त शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला पायी जाणाऱ्या साईभक्तांना युवा नेते श्री.विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव-शिर्डी रस्त्यावर समृद्धी उड्डाणपूलाखाली सुगंधी दूध वाटप करण्यात आले.युवा नेते श्री.विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठान अनेक सामाजिक कार्य करत आहे. यामध्ये दरवर्षी सर्व धर्मिय सामुदायिक सोहळ्याचे दिव्य असे आयोजन करण्यात येते.यंदाही आयोजन करण्यात आले आहे. पूरग्रस्तांना […]

Read More

श्री साईगाव पालखीचे सपत्नीक पूजन करून आ.आशुतोष काळेंनी साई भक्तांना दिल्या शुभेच्छा ;कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळामुळेश्रीराम नवमीला साईंचे दर्शन सौभाग्याची गोष्ट:- अभिनेत्री दीपिका…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – श्री साईगाव पालखी व मुंबादेवी तरुण मंडळ यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे याहीवर्षी श्री राम नवमीनिमित्त कोपरगाव वरून शिर्डीला जाणाऱ्या साई पालखीचे आ. आशुतोष काळे व त्यांच्या पत्नी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी आ. आशुतोष काळे हे देखील सपत्नीक साई पालखी सोहळ्यात सहभागी […]

Read More

निराधाराला निवारा देण्याचे टेके पाटील ट्रस्टचे कार्य सर्वश्रेष्ठ:- सुहास गोडगे ; निराधार मनोरुग्ण विक्रम तानसरे यास निवारा भेट…

कोपरगाव प्रतिनिधी:- मनुष्य म्हणून प्रत्येक जण जन्म घेतो. लहानचा मोठा होतो. या जीवन प्रवासादरम्यान एखादी अनपेक्षित घटना घडून जाते. आणि त्यातून त्या मनुष्याचे जीवनच बदलून जाते. अशा धक्क्यांमधून एखादी व्यक्ती मनोरुग्ण होऊन नंतर निराधार होते. अशावेळी अनेक संकटांना सामोरे जावे लागते. परंतु; मानवतेच्या भावनेतून त्यांची जाणीव ठेवून त्यांना मदत करण्यासाठी पुढे येणारे हात खूप महत्त्वाचे […]

Read More

श्री साईगाव पालखी सोहळयासाठी आ. आशुतोष काळेंनी काखेत झोळी अडकवत मागितली भिक्षा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- श्री रामनवमी निमित्त कोपरगाव शहरातील तहसील कार्यालयाच्या मैदानावर श्री साईगाव पालखी सोहळा व मुंबादेवी तरुण मंडळ यांच्या वतीने ह.भ.प. चारुदत्त महाराज आफळे यांच्या सुश्राव्य वाणीतून श्री विष्णुपुराण महाकथा आयोजित करण्यात आली असून मंगळवार (दि.१६) रोजी आ.आशुतोष यांनी कार्यक्रमास उपस्थित राहत काखेत झोळी अडकवत श्री साई गाव पालखी सोहळ्यासाठी भिक्षा मागितली.श्री साईबाबा […]

Read More

भारतीय विस्तार शिक्षण सोसायटीच्या उपाध्यक्षपदी डॉ. मिलिंद अहिरे यांची निवड….

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-भारतीय विस्तार शिक्षण सासायटीच्या उपाध्यक्षपदासाठी देशात नुकतीच ऑनलाईन निवडणूक पार पडली. ही निवडणूक देशामध्ये चार विभागात घेण्यात आली. डॉ. मिलिंद अहिरे यांनी पश्चिम विभागाच्या उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरला होता. पश्चिम विभागात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि गोवा या चार राज्यांमधुन निवडणूक ऑनलाईन पध्दतीने पार पडली. यामध्ये डॉ. मिलिंद अहिरे यांना सर्वात जास्त 90 […]

Read More

‘आत्मा मालिक पॅटर्न पुन्हा अव्वल’एन.एम.एम.एस परीक्षेत 160 विद्यार्थी गुणवत्ता यादीत व सारथी साठी 229 विद्यार्थी पात्र….

कोपरगांव प्रतिनिधी:- राष्ट्रीय आर्थिक दुबर्ल घटक शिष्यवृत्ती (एन.एम.एम.एस.) परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला. यामध्ये आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलाचे 160 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहे.राज्यात एका शाळेत सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याचा मान नवव्यांदा आत्मा मालिकने मिळविला. या विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार रुपयाप्रमाणे चार वर्षासाठी 48000 रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. 160 विद्यार्थ्यांनी 76 […]

Read More

आत्मा मालिक येथे भारतीय खेल प्राधिकरण (SAI) तर्फे मल्लांची भरती…

कोपरगाव प्रतिनिधी:-दिनांक 29 ते 30 एप्रिल 2024 रोजी भारतीय खेल प्राधिकरण यांच्या वतीने आत्मा मालिक कुस्ती केंद्र, कोकमठाण येथे नवीन मल्लांची भरती प्रक्रिया घेण्यात येणार असून त्यासाठीची निवड चाचणी ही आत्मा मालिक कुस्ती केंद्र, कोकमठाण या ठिकाणी आयोजित केली गेलेली आहे. भारतीय खेल प्राधिकरणाच्या वतीने ही निवड चाचणी प्रक्रिया होणार असून षासकीय कुस्ती कोच श्री.रुपेंदर […]

Read More